शिक्षक दीन (क्रम) असाही; “आम्हाला शिकवू द्या हो”

शिक्षक दीन (क्रम) असाही



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_”आम्हाला शिकवू द्या हो”_

सकाळी सात वाजले तरी आज काळे गुरुजी झोपलेलेच.रात्री उशिरापर्यंत *’सरल’ नावाच्या तिरक्या पोर्टलने* गुरुजींना रात्री उशिरापर्यंत जागं ठेवलं.लेकरानं ‘पप्पा, आज शाळा नाहीय का? म्हणून विचारले तसे डोळे चोळतच गुरुजींनी उशीच्या खाली कोंबलेल्या मोबाईलला बाहेर काढले.(पूर्वी लोक उठल्याउठल्या देवाचं दर्शन घ्यायचे म्हणे).नेट चालू करून *पहिले वाट्सअप उघडले.प्रशासकीय ग्रुप उघडून पाहिला* आणि गुरुजींचा चेहरा त्रासिक झाला.आधारकार्ड नसलेल्या ४/५ पोरांनी शाळेचं नाव आधार अपूर्ततेच्या यादीत आणलेले.ठसे उमटत नसलेल्या आणि काहीही न सांगता गायब झालेल्या पोरांचं आॕफिसला काय सांगावं ह्या विवंचनेत गुरुजींनी त्यांचं आवरलं.
चहाचा घोट घशात ढकलताना गुरुजी वृत्तपत्रावर नजर फिरवत होते.*’गुरुजी अजिबात काही काम करत नाही…जि प शाळांचा पट घसरला’* हे जावईशोध वाचताना गुरुजींना प्रचंड त्रास झाला.कुणीही उठावं आणि शिक्षकांना टपली मारुन जावं असंच काहीसं झालेलं.तितक्यात वाजलेल्या फोनने गुरुजी काहीसे भांबावले.आज *’गुणवत्ता कक्ष’ मिटिंगला आॕनलाईन उपस्थित रहायचं* ते फर्मान होतं.ती लिंक बघेपर्यंत दोनचार *माहित्या आजच अर्जंट आॕफिसला द्यायच्या होत्या*.खरंतरं ‘अभी के अभी’ ची ही सवय डोक्यात जाणारीच.विचारांच्या तंद्रीतच गुरुजी शाळेत पोचले.प्रसन्न आणि *हसऱ्या चिमुकल्यांच्या गुड माॕर्निंगने सकाळचे अस्वस्थतेचे मळभ क्षणात नाहीसे केले*.आज मस्त इंग्रजी अॕक्टिव्हिटी आणि चार वाजता खोखो घेऊ म्हणजे पोरं जाम खूश होतील ह्या विचारात गुरुजींनी मस्टरवर सही केली.
आॕफिसमधल्या आरशात स्वतःला बघत गुरुजींनी शर्ट इन ठाकठीक केली तोवर *चौथीतल्या आधारकार्ड नसलेल्या एका मजूराचं पोरगं बापासह दारात हजर*. “सर,अहो ह्या आधारकार्डापायी रोज बुडतो.मग आम्ही खायचं तरी काय…? ” गुरुजी निरुत्तर पण सकाळची यादी आठवली.मी स्वतः तुम्हाला घेऊन जातो असं सांगत मुख्याध्यापकांना सांगून गुरुजी निघाले तोच वर्गातील मुले हिरमुसली.’बाळांनो अर्ध्या तासात येतो’ तोवर धडा वाचून काढा अशी समजूत घालून *गुरुजींनी पुढचा १ तास आधार सेंटर वर खर्च केला*.आधारचं काम होणं म्हणजे समुद्रात हरवलेली सुई सापडणे होय.लगबगीने गुरुजी शाळेत आले.लाकडी कपाटावर किंचित वाकलेल्या बाॕक्समधून पटकन २/३ खडू घेतले आणि वर्गात पोचले.*आज जे शिकवायचं होतं ते एक तास लेट का असेना पण शिकवायला मिळणार* ह्या आनंदात पटकन हजेरी घेतली.आवडते गुरुजी वर्गात आल्याने पोरंही सुखावले.सारं कसं जमून आलेलं.
कवितेच्या चार ओळी वाचून संपल्या न संपल्या *गुरुजींचा फोन वाजला*.मोजता येतील इतक्या आठ्या कपाळावर उमटून गुरुजींनी फोन उचलला.*सर,तुमचे आधार व मतदान लिंकिंगचे काम खूप हळू चालूय.लौकर ते काम करा नाहीतर तहसीलदार साहेबांना तुमचा रिपोर्ट करावा लागेल..!”* तहसीलमधल्या साहेबाने एका शब्दात गुरुजीला दरडावून सरांचं काहीही ऐकून न घेता फोन ठेवला तसा गुरुजींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.आपण शिक्षण विभागाचे कि महसूलचे कर्मचारी असं मनात चडफडत गुरुजींनी कविता शिकवणे सुरू केले.*आधार आणि तहसीलच्या गर्दीत गुणवत्ता कक्षाच्या मिटिंगला काळे गुरुजी न दिसल्याने केंद्रप्रमुखांचा फोन आला.* गुरुजींनी घाईत मिटिंग जाॕईन केली. *पोरांचे हताश चेहरे बघून गुरुजींनी audio/vdo बंद करून खऱ्या गुणवत्तेसाठी अध्यापन सुरू केले.* तासभर रंगलेल्या कवितेत गुरुजींचा सारा थकवा कुठल्याकुठे पळून गेला आणि मिटिंगही संपली.
मध्यान्ह भोजनाची वेळ झाली तशी सारी मुलं रांगेत बसली.*गुरुजींनी सारी मुलं जेवायला व्यवस्थित बसली कि नाही ते पाहिले.* आई लेकराला बघते अगदी तसे.सगळा स्टाफही मग जेवायला बसला. *जेवणाचे दोन घास घशात ढकलत नाही तोवर पोरांच्या भांडणाचा गलका ऐकू आला तसे काळे गुरुजी उठले.* लेकरांचं भांडण मिटेपर्यंत जेवणाचे तंत्र बिघडले. *उरलेले नुसतं गिळून pfms द्वारे पैसे ट्रान्सफर साठी गुरुजी आॕफिसात बसले*.गुरुजी तसे हुशार.लॕपटाॕपवर सरसर काम करायचे.मेकर,चेकर आणि न चालणाऱ्या साईटसच्या गर्दीत गुरुजीचा ‘डेटा’ आणि ‘डाटा’ दोन्ही पणाला लागले. *शाळा भरली पण पोरांपेक्षा pfms अधिक महत्त्वाचे असल्याने वर्ग पुन्हा तुटला.* आपण शिकवण्यासाठी कि कारकूनी कामासाठी ह्या असह्य तडफडीत गुरुजींची चर्या अधिकच त्रासली.
*इतके कमी कि काय आधार लिंकिंग वाले मधूनमधून झळकून कागद देऊन जात*.तीन वाजले तरी साईट चालेना म्हणून गुरुजी वर्गात निसटले.पुन्हा कुणाचा ताण नको म्हणून मोबाईल बंद करुन आपल्या नेहमीच्या लयीत अध्यापन करु लागले. *चार वाजेची वेळ झाली.ही वेळ म्हणजे खेळ आणि मस्तीची*.खोखो गुरुजी आणि पोरांचा आवडता खेळ.टीम पडल्या.खो चा गलका झाला.डाव रंगात आला *तसा आॕफिसमधून सांगावा आला.डीबीटीची माहिती आज आता लगेच भरायची.* खेळ मोडून गुरूजी डाटा एंट्री आॕपरेटर बनून गेले.गुरुजींचा मूड आणि पोरांचा डाव चांगलाच विस्कटला.शाळा सुटली.*”सर,उद्या काहीच कामं आणू नका बरं” असं प्रेमळ आर्जव करित पोरांनी बाय केला तेव्हाच गुरुजीच्या मनात कालवाकालव झाली*.वेगवेगळे महोत्सव आणि पंधरवाडे;दिवसाआड घ्यायच्या शपथा;तूटून पडणाऱ्या लिंक्स;राज्य,जिल्हा,डाएट आणि अगदी तालुकास्तरावरुन येणारी विविध पत्र आणि उपक्रम यांची अंमलबजावणी,Ngo वाले वेगळेच आणि हे सारे करण्यात गुरुजी पोरांपासून दुरावला ह्या विचारांनीच काळे गुरुजी अक्षरशः मेटाकूटीस आले.”काळे सर तेवढे *रात्री साईट चालते तेव्हा सरलचं काम पूर्ण करा बरं आणि डीबीटीचंही तेवढे बघून घ्या ” असं सांगत मुख्याध्यापक निघून गेले.*
काळे गुरुजी *घरी आले तेव्हा लहानं लेकरु पायात घुटमळलं.**

~किती आनंदाची ही बाब पण उद्विग्न गुरुजीपुढे अनेक कामं आता वाट बघत होती~.

*चहा झाला तशी घरची कार्टी बाहेर फिरायचा हट्ट करु लागली.* शाळा सुटल्यावरही शाळा ‘न’ सुटल्याने गुरूजी पुन्हा laptop घेऊन सरल आणि डीबीटीच्या पोटात शिरले.रात्रीचे आठ वाजले. *आठच्या बातम्या कानावर पडू लागल्या.शिक्षक कामे करत नाहीत…जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक कामचूकार आहेत…स्वतःहून कामे लावून घेतात…गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत नाही…कोरोना बळींसाठी शिक्षकही जबाबदार …अशा आरोपांच्या फैरी शिक्षकांवर बरसत होत्या.*

*~गुरुजींच्या डोळ्यांत टचकन पाणी आले.~*

चारशे कोटींचा csr जमवणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक..झपाटून काम करुन शाळांचंं रुपडं बदलणारे शिक्षक..विद्यार्थी गुणवत्तेसाठी नानाविध प्रयोग करणारे शिक्षक …कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फिल्डवर दिलेलै प्रत्येक काम पूर्ण करणारे शिक्षक…स्पर्धा परीक्षांत डंका मिरविणारे शिक्षक …जिल्हा परिषद शाळांचा पट वाढविणारे शिक्षक ..असंख्य अशैक्षणिक कामांचे ओझे वाहत गुणवत्तेसाठी समर्पण करणारे गुरुजी…तंत्रज्ञानाची कास धरत अध्ययन सुलभ करण्यासाठी झटणारे शिक्षक ….आज सारेच झूठ ठरविण्याची स्पर्धा बघून काळे गुरुजी पूरते हतबल झाले. *’आम्हाला शिकवू द्या’ असा टाहो फोडेपर्यंत कामांचा अतिरेक झाला* पण तो थंडावलेल्या कानांपर्यंत न पोचता गुरुजींना आरोपी बनविण्याच्या स्पर्धेत रोज पडणाऱ्या उड्या विलक्षण त्रासदायक ठरल्या.
अन्नाचे दोन घास कसेबसे ढकलून गुरुजींनी पाठ टेकली.इतक्या वर्षांची सेवा आठवली.कारकीर्दीतील तिन्ही शाळा आठवल्या.तालुक्याला जाणाऱ्या खासगी स्कूल बस बंद केल्यापासून ते लाखोंचा लोकसहभाग मिळवून बदलवलेल्या शाळा आठवल्यात.उडदामाजी काळेगोरे असतातही म्हणून संपूर्ण समूदायावर होणारी अश्लाघ्य चिखलफेक काळे गुरुजींना अस्वस्थ करत होती.*पोरांसाठी तळतळणाऱ्या जीवांना प्रशासन माहितीच्या कैचीत पकडून किती काळ जखडून ठेवणार* हा विचार गुरुजींचा पिच्छा सोडेना.आज काळे गुरुजी पहिल्यांदाच इतके हतबल झालेले.मोबाईलवर तेवढयात आलेल्या मेसेजने सरांचं डोकेच बंद पडले.ते कुठल्याशा पंधरवड्याचं पत्र होतं.पुन्हा स्पर्धा आणि फोटो प्रपंच.सोबतीला लिंक्स.’आम्हाला शिकवू द्या’ हो…’आम्हाला शिकवू द्या हो’…असंच काहीसं बडबडत गुरूजी कधीतरी झोपी गेले..!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles