मराठी नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे भारत भवन संस्थेच्या अध्यक्षपदी

मराठी नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे भारत भवन संस्थेच्या अध्यक्षपदी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_दोन वर्षासाठी असेल नियुक्ती_

नवी दिल्ली : मध्य प्रदेश शासनाची राष्ट्रीय बैठक असलेली आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव पाडलेली, वैभवशाली स्वायत्त सांस्कृतिक संस्था आहे भारत भवन भोपाळ.

नुकत्याच झालेल्या भारत भवन विश्वस्त मंडळाच्या बैठकीत प्रख्यात नाट्यकर्मी पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांची पुढील दोन वर्षांसाठी सदर संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. 1982 साली स्थापन झालेल्या या संस्थेने अवघ्या काही वर्षातच संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले व एक आदर्श सांस्कृतिक संस्था कशी असावी याचा वस्तुपाठ देशासमोर मांडला.

नाटक, संगीत, ललीतकला, साहित्य, लोककला, चित्रपट असे महत्त्वाचे विभाग हाताळणारी ही जगावेगळी सांस्कृतिक संस्था आहे. कलेच्या प्रांतात मानदंड स्थापन करून भारतीय कलेला वेगळे आयाम देण्यात यशस्वी ठरलेली ही संस्था.

या संस्थेचे अध्यक्षपद या पूर्वी अर्जुन सिंग, पुपुल जयकर, सुन्दर लाल पटवा, दिग्विजय सिंह, अशोक बाजपेई, दया प्रकाश सिन्हा, पंडित जसराज, डॉ पद्मा सुब्रमण्यम अशा दिग्गज व्यक्तिंनी भूषविले आहे. सदर पदी निवड झालेले प्रा. वामन केंद्रे हे पहिले मराठी कलावंत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles