ज्ञानेश्वर माशाळकर आचार्य पदवीने सन्मानित
उस्मानाबाद: भारत विद्यालय बेडग्याचे शिक्षक ज्ञानेश्वर माशाळकर यांना दिल्ली येथील विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगाने शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी डॉक्टरेट इन एज्युकेशन ही आचार्य पदवी पाच सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने देण्यात आली आहे.
या प्रसंगी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे तसेच संचालक तथा भारत विद्यालय बेडगा शाखेचे अध्यक्ष श्री भानुदासराव बापू माने, प्रशालेचे मुख्याध्यापक आर एल चौहान प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी, सरपंच सौ उषाताई माने, उपसरपंच अनिल माने तसेच श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.भीम महाराज,ह.भ.प.हरी गुरुजी लवटे,संजय राठोड,नरसींग लवटे, राजेंद्र माळी,ह.भ.प.जनार्धन महाराज, पंडित साहेब,शिरगुरे साहेब, विजयकुमार पाटील सर, श्री काका साळुंके सर ,श्री ज्ञानेश्वर विद्यालयचे माजी प्राचार्य एस वार जाधव साहेब, श्री बंडू गुरुजी, भाग्यवान पाटील , बाबुराव लवटे आण्णा, चोपदार गोपाळ मामा, नेताजी पाटील तसेच गावातील व परिसरातील सर्वांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.