भिवापूर येथे तालुकास्तरीय शिक्षक गौरवपुरस्कार कार्यक्रम संपन्न

भिवापूर येथे तालुकास्तरीय शिक्षक गौरवपुरस्कार कार्यक्रम संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दि.12/9/2022ला भिवापूर महाविद्यालय येथे माननीय आमदार राजू पारवे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच शिक्षणाच्या जनक, स्त्रियांच्या उध्दारक क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.

यात मान.श्रीमती ममताताई शेंडे सभापती भिवापुर,मान.श्री.राहुल मसराम (पं.स.सदस्य), मान.सौ.माधुरी देशमुख (पं स सदस्य), आयु.नेमावलीताई माटे (सभापती समाज कल्याण नागपूर),मान.श्रीमान मनोज हिरुळकर (गटविकास अधिकारी भिवापुर),मान.श्रीमान भाष्कर झोडे (उप शि.अ.नागपूर), मान.श्रीमान. कुंभरे (शि.वि.अ.नागपूर),सन्मानिय प्राचार्य. डॉ. जोबी जाँर्ज महाविद्यालय भिवापुर, मान.श्रीमान विजय कोकोडे (गटशिक्षणाधिकारी भिवापुर) ,मा.श्रीमान दिलिप शहारे(शा.पो.आ.),मान. श्री.ऋग्वेद भांडारकर(शि.वि.अ)मान.श्रीमान. राजेश शेट्टे(शि.वि.अ),सर्व केंद्र प्रमुख, सर्वसाधनव्यक्ती,सर्व मु.अ/स.अ/पत्रकार, वार्ताहर व इतर हजर मान्यवर होते.

तालुकास्तरीय शिक्षक गौरवपुरस्काराने सन्मानित 11 शिक्षक/शिक्षिका तसेच जिल्हा आदर्श पुरस्कार सन्मानित श्री.संतोषराव खंडेराव जि.प.प्रा.शा.किन्हाळा यांचेसुध्दा मान. आमदार पारवे यांचेहस्ते व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुकास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कुत मानकरी खालीलप्रमाणे
१)श्रीमती साधना मोतीराम सोनकुसळे (जिप उप्राशा कवडशी बरड)
२)श्रीमती सुरेखा प्रेमलाल इखार(जिपप्रा शा झिलबोडी)
३)श्री.सतिश बाबुराव चव्हाण(जिपप्राशा वणी)
४)श्री.अरुण पुंडलिक बावने(जिपउप्राशा तास)
५)श्री.अनिल जगराम राठोड(जिपउप्राशा अड्याळ)
६)श्रीमती वनिता भगवान भोंगाडे(जिप उप्राशा सालेशहरी)
७)श्री.संदिप परसराम जुवारे (जिप उप्राशा मानोरा)
८)श्री.सहादेव झिबल मोहनकर(जिपप्राशा पांजरेपार नांद केंद्र महालगाव)
९)श्रीमती शिला दत्तुजी रोडे (जिपउप्राशा मालेवाडा)
१०)श्री.सुरजलाल सुखराम येल्ले (जिप उप्राशा पाहमी)
११)श्रीमती अनिता अशोक ठाकरे(जिपहाय.जवळी)
याप्रमाणे 1ते 11शिक्षक(सपत्निक) मान.आमदार व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मान.आमदार यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याचे मला भाग्य लाभले, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल हे या सन्मानित शिक्षकांकडुन घ्यावेत, त्यांचा आदर्श जोपासावा,बाकीचे आमदार शिक्षकांप्रती काय-काय बोलतात असा त्यांनी टोलालाही लगावला. सभागृहात हशा व टाळ्यांचा उस्फुर्त पणे कडकडाट झाला.

कोकोडे गटशिक्षणाधिकारी यांनी प्रास्ताविक केले. तर मान.श्रीमती नेमावली माटे(सभापती स.क.नागपूर) मान.भाष्कर झोडे (उप.शि.अ.नागपूर), मान.हिरुळकर गटविकास अधिकारी भिवापुर, मान.मसराम (पं.स.सदस्य) यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्यात अशाप्रकारे तालुकास्तरीय शिक्षक/शिक्षिका गुणगौरव पुरस्कार संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन श्री संजय खोब्रागडे व रिता नेवारे यांनी केले तर आभार श्री ऋग्वेद भंडारकर यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles