फुटाळा फाऊंटनचे 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान ‘ ट्रायल शो ‘

फुटाळा फाऊंटनचे 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान ‘ ट्रायल शो ‘पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : फुटाळा तलावातील पाण्यात सुमधूर गीतांच्या तालावर थुईथुई नाचणारा , उचंच उच फवारे उडवणारा , इंद्रधनुषी रंगाची उधळण करणारा , पाण्याच्या अप्रतिम ‘ स्क्रीन ‘ वर नागपूरच्या इतिहास झलक दाखवणारा , अंगावर रोमांच उभे करणारा फाउंटन आणि लाईट शो आता प्रत्येकाला बघायला मिळणार आहे .

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने येत्या , 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणा या फुटाळा तलावावरील या अतिशय देखणा , अप्रतिम , अवर्णनीय असा म्युझिकल फाउंटन आणि लाईट शोचे दरदिवशी रात्री 7 व 9 वाजता असे दोन ‘ ट्रायल शो ‘ आयोजित करण्यात आला आहे .

या ऐतिहासिक शोचे नागपूरकरांना परत एकदा साक्षीदार होता येणार आहे . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महत्वपूर्ण तसेच महत्वाकांक्षी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत . त्यापैकीच एक सुप्रकल्प म्हणजे प्रसिध्द फुटाळा तलावाच्या निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणारा हा म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो आहे . त्याअंतर्गत फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा तयार करण्यात आला असून त्याला अप्रतिम लाईट व म्युझिक शोची जोड देण्यात आलेली आहे .

संगीताच्या तलावर नाचणा – या या फाउंटनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून ते पाहिल्यावर डोळे दिपून जातात . मुझिकल फाउंटनबरोबर वाजणा – या संगीताला दिग्गज संगीतकार ए . आर . रेहमान यांनी संगीत दिले असून ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टी यांनी म्युझिक डिझाइन केले आहे . नागपूरच्या इतिहासाच्या इंग्रजी कॉमेंट्रीला बीग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला असून हिंदी भाषेतील कॉमेंट्री प्रख्यात गीतकार – दिग्दर्शक गुलजार यांनी तर मराठीतील कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या भारदस्त आवाजात ऐकायला मिळते . 24 व 25 ऑगस्ट दरम्यान या शोचे काही ठराविक लोकांसाठी ट्रायल शो आयोजित करण्यात आले होते . पण आता नागपुरातील प्रत्येक नागरिकाला या अवर्णनीय शोचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे .

गर्दी , गोंधळ , गैरसोय टाळण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पासेसची व्यवस्था केली असून या पासेस ट्रायल शो च्या दिवशी सकाळी ११ वाजता , मा . केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय , सावरकर नगर , ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ , खामला , नागपूर येथून प्राप्त करता येतील . तेव्हा प्रत्येकाने या नेत्रदीपक फाउंटन आणि म्युझिकल शोचा अनुभव घ्यावा , असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा . अनिल सोले यांनी केले आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles