चर्चमध्ये आमदारांनी शपथ घेऊनही शेवटी गोव्यात कॉंग्रेस फुटलीच

चर्चमध्ये आमदारांनी शपथ घेऊनही शेवटी गोव्यात कॉंग्रेस फुटलीचपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोवा: महाराष्ट्रानंतर गोव्यात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी पक्षांतराचा प्रयोग फसल्यानंतर आज अखेर, काँग्रेसच्या आठ आमदारांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विरोधीपक्षनेते मायकल लोबो माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांचा यात समावेश आहे.

गोवा विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. यावेळी पक्षाने गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेतला, पण प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते गुंडूराव यांच्यावर नाराज होते. दिनेश गुंडूराव यांनी मात्र भाजपवर आरोप करत, गोव्यात लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पैसा आणि सत्तेचा वापर करून विरोधक संपविण्याचे काम भाजप करत आहे. असा आरोप गुंडूराव यांनी केला आहे.

काँग्रेस आमदारांनी ऐकेकाळी पक्षांतर करणार नाही यासाठी मंदीर, चर्च मध्ये जाऊन शपथ घेतली. गोव्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस फुटीची चर्चा राज्यात होतीच तिला बुधवारी मुर्त स्वरूप आले आहे. यामागील कारणे शोधून आत्मपरीक्षणाची कॉंग्रेसला सध्या गरज असल्याची चर्चाही जोर धरत आहे.

गोवा विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यात काँग्रेस आमदारांनी बंड केले. भाजपमध्ये सामिल होण्याचा पवित्रा घेतलेल्या आमदारांचे बंड त्यावेळी फसले. त्यानंतर काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक राज्यात दाखल झाले. त्यावेळी बंडखोर आमदारांची तात्पुरती समजूत काढण्यात वासनिक यांना यश आले होते. पण, पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी प्रकर्षाने दिसत होती. त्यासाठी पक्षाने किंवा केंद्रीय नेतृत्वाने पुरेसे प्रयत्न केले नाहीत हे उघड सत्य आहे. याशिवाय इतर चुकां ज्या पक्षाला भोव्याला याची देखील सर्वत्र चर्चा होत आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी दिसून आली. यावेळी पक्षाच्या चार आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. यावरही पक्षाकडून ठोस उपाययोजना झाली नाही. तसेच, नव्या अध्यक्षांवरून वाद निर्माण झाला पण पक्षाने कारवाई केली नाही. मायकल लोबो यांनी निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. लोबो यांना विरोध होत असताना दिगंबर कामत यांना डावलून पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेते केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles