
‘आरटीई फाऊंडेशन’च्या तालुकाध्यक्षपदी संतोष राऊत तर सचिवपदी जितेंद्र मौर्य
तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया: जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिर्हेपुंजे पब्लिक स्कूल येथे आज दि. १७ सप्टेंबर रोजी ‘आरटीई फाऊंडेशन’च्या वतीने तालुकास्तरीय सभा आयोजित करण्यात आली. आरटीई फाउंडेशन इंडिया जिल्हा गोंदियाच्या सड़क अर्जुनी तालुका अध्यक्ष पदावर संतोष राऊत तर सचिव पदावर जितेंद्र मौर्य यांची निवड करण्यात आली.
आयोजित सभेच्या अध्यक्ष स्थानी आरटीई फाउंडेशन इंडिया जिल्हा गोंदियाचे अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हा सचिव सुनील आवळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपरोक्त सभेत अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामधे संतोष टी राऊत प्याराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड यांची अध्यक्ष पदावर तर जितेंद्र के. मौर्य रॉयल प्रिंस पब्लिक स्कूल सड़क अर्जुनी यांची सचिव पदावर निवड करण्यात आली.
उपरोक्त सभेमध्ये खाजगी कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळेची वंचित व दुर्बल घटकातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शिल्लक असलेल्या शैक्षणिक शुल्कवर चर्चा करण्यात आली. तसेच जुन्या शाळेतून टीसी न घेऊन जाता दुसर्या शाळेत कसे प्रवेश दिले जाते याचे समाधानकारक मार्ग कसे काढता येईल यावर चर्चा करण्यात आली.
त्याचप्रमाणे मा. शिक्षणाधिकारी यांनी पालकांकरिता टीसी काढण्याची एक ठराविक कालावधी निश्चित करून जुन्या शाळेची शिल्लक असलेली शुल्क जमा केल्यानंतर टीसी पालकांना देण्यात यावी, यावर विचार करण्यात आले. सभेचे अध्यक्ष प्रा. आर डी कटरे जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनमध्ये खाजगी शाळेला असलेल्या समस्या व त्याचे निराकरण आपल्याला कश्या प्रकारे करता येईल मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे आरटीई बद्दल असलेल्या अडचणी संस्था संचालकांना सांगितले. व आरटीई फाउंडेशन च्या कार्याची जाणीव त्यांनी करून दिली. सभेला शेषराव जी गिर्हेपुजे, संतोष राऊत, जितेंद्र मौर्य, सौ.दयावंता राऊत, सुनील आवि, सौ सीमा यावलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.