‘सैराट’चा अभिनेता सूरज पवार अद्यापही फरार; फसवणूक प्रकरणातील आरोपी असल्याचा संशय

‘सैराट’चा अभिनेता सूरज पवार अद्यापही फरार; फसवणूक प्रकरणातील आरोपी असल्याचा संशय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अहमदनगर: सैराट चित्रपटाने प्रसिद्धीस आलेल्या ‘प्रिन्स’ उर्फ सूरज पवार हा मंत्रालयामध्ये नोकरी देण्याच्या अमिषापोटी पैसे उकळणार्‍या टोळीचा भाग असलेला ‘सैराट’ फेम प्रिन्स उर्फ सूरज पवार अद्यापही फरार आहे. फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा त्याच्यावर संशय असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तैनात आहे. यासह आरोपींना गरजवंत मुलांचे मोबाईल क्रमांक पुरविणार्‍या विजय बाळासाहेब साळे (रा. खडांबे ता. राहुरी) या आरोपीला राहुरी हद्दीतून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. सूरज पवार याचे नाव नोकरीच्या अमिषापोटी पैसे उकळणार्‍या टोळीत घेतले जात आहे.

नगर जिल्ह्यातील भेंडा फॅक्टरी (ता.नेवासा) येथील तरूण महेश वाघडक याने चतुराई दाखवित बनावट कागदपत्रांद्वारे मंत्रालयामध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. यामध्ये कक्ष अधिकारी अशी बतावणी करणारा दत्तात्रय अरूण क्षीरसागर (रा. मालेगाव, नाशिक) याच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ व्हीआयपी विश्रामगृह ठिकाणीच मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. आरोपी क्षीरसागर याने राहुरी बसस्टँड येथे मागितलेल्या पाच लाखांपैकी उर्वरित 3 लाख रुपये घेण्यासाठी तक्रारदाराला बोलविले होते.

महेश वाघडक याने बनावट कागदपत्रांना पाहून आरोपींचा भांडाफोड केला. त्यानंतर त्याचा संगमनेर येथील साथीदार आकाश विष्णू शिंदे व भारतीय राजमुद्रा तसेच शासकीय शिक्के तयार करून देणारा ओमकार नंदकुमार तरटे असे तिघे जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. यानंतर आकाश शिंदे यास बेरोजगार तरूणांची माहिती व क्रमांक पुरविणार्‍या चौथ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विजय साळे (वय 31) या तरूणाच्या अटकेनंतर या प्रकरणात अजून कोणावर कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

या संदर्भात बनावट शिक्के तयार करण्यासाठी ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेता सूरज पवार हा उपस्थित होता. त्यानेच बनावट शिक्के तयार करण्यासाठी शॉर्ट फिल्मचे कारण दिले. त्यावेळी कोणत्या तरी व्यक्तीला फोन लावत त्याचा प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे बोलत असल्याचा बेबनाव केला होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये ट्वीस्ट निर्माण झालेला आहे. पोलिस सूरज पवारच्या शोधात आहेत. या प्रकरणात मंत्रालयातील संबंधित अधिकारी व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचीही प्रतिक्रिया पोलिस घेणार असल्याचे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles