केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची चिटणवीस सेंटर येथील कला प्रदर्शनाला सदिच्छा भेट

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची चिटणवीस सेंटर येथील कला प्रदर्शनाला सदिच्छा भेट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: “आंबेडकर फाईन आर्टस् रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन” तर्फे दिनांक 26/09/2022 ते 29/09/2022 या कालावधीत चिटणवीस सेंटर, नागपूर येथे राष्ट्रीय स्तरावर कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशाच्या विविध राज्यातून विविध कलाकार आपल्या विविध प्रकारच्या दुर्मिळ व उत्कृष्ट कलाकृतीचे सादरीकरण केले.

या कला प्रदर्शनीचा मा.ना.श्री. नितिनजी गडकरी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, भारत सरकार यांनी दिनांक 29/09/2022 ला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कलाकारांच्या कलाकृतींचे निरीक्षण केले व त्यांची प्रशंसा केली. त्यावेळी संस्थेच्या वतीने त्यांच्या हस्ते अरूणचाल प्रदेश येथील कलाकार श्री. टेची टागू तारा यांना रू 25,000/- ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

श्री. नितिनजी गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व कलाकारांना मार्गदर्शन केले. तसेच नागपूर शहरात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात काही उपक्रम राबविले जातील असे आश्वासन दिले. या प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनाकरिता आयोजक श्री. विक्रम निकोसे, डॉ.करिश्मा कांबे, श्री. राहुल मुडे, अनिरूद्ध फुंडकर व मनिष बोबडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles