
आजचे कृतीशील विद्यार्थी उद्या देश घडविणार
_उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड_
नागपूर: शिक्षण हे सर्वागिण विकासाचे प्रवेशव्दार आहे आणि या शिक्षणाशिवाय कुणाचाही उध्दार होऊ शकत नाही. परंतु हेच शिक्षण कृतीप्रधान असेल तर मात्र आजचे विद्यार्थी हेच भविष्यातील भारताला घडवतील असे मत नागपूर जिल्हाचे उपशिक्षणाधिकारी सुशिल बन्सोड यांनी बाबा रघुनाथस्वामी हायस्कूल, राजीव गांधीनगर, नागपूर या शाळेतील शाळा स्तरावर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात बोलतांना व्यक्त केले.
विद्यार्थी हा कृतीतून शिकला तर तो कोणत्याही समस्यांना तोडगा काढतो व तो यशस्वीच होतो. नैराश्य हे त्याला स्पर्शदेखील करू शकत नाही असे ते बोलले. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. विद्यार्थ्याच्या सुप्त कला गुणाचा विकास करावयाचा असेल तर त्यांच्या छंदाचा सुध्दा विकास करावा लागेल या करीता शाळेशाळेतून विज्ञाण प्रदर्शनी आयोजित करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन हे विज्ञान व गणित विषयापूरतेच मर्यादित नसावे तर सर्व विषयाचा यात समावेश असावा असे प्रज्ञा मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपले मत मांडले.
सदर कार्यक्रमाला बि.जी.एस. हायस्कूल व ज्युनीअर कॉलेज , जरीपटका नागपूरच्या प्राचार्या मा. दौलतानी मॅडम यांनी आपली उपस्थिती दर्शविली . सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक हरीश्चंद्र नागोसे यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रम घेण्यात आला असून कार्यक्रमाचे संचालन इयत्ता 6 वीची विदयार्थीनी कु. वंशिका गिरी हिने केले. तिच्या वकृत्व कलेचे गुणगौरव करतांना तिचे अभिनंदन सुशिल बन्सोड , उपशिक्षणाधिकारी ,जि.प. नागपूर यांनी केले. सदर शाळेत एकुण 85 प्रयोगाचे प्रदर्शन केले आहे.