नाना पटोले यांनी केली राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी….!

नाना पटोले यांनी केली राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी….!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बुलढाणा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींची तुलना साक्षात प्रभू रामचंद्रांसोबत केलेली आहे. ज्याप्रमाणे रामाने सुद्धा वनवास भोगला आणि प्रवास केला….. ते सुद्धा राजकुमार होते आणि राहुल गांधी सुद्धा राजकुमार आहेत त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही रामाच्या वनवासाप्रमाणेच आहे अशी तुलना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करून राहुल गांधी यांची तुलना थेट प्रभू रामचंद्रशी केली आहे.

*भाजप हा बहुजनांचा पक्ष नाही; नाना पटोले*

भाजपमध्ये बहुजनांना त्रास दिला जातो त्यामुळे भाजप हा बहुजनांचा पक्ष नाही हे मी स्वतः त्या पक्षात राहून अनुभवलेला आहे .भाजपमधील अनेक नेते जसे पांडुरंग फुंडकर ,गोपीनाथ मुंडे , एकनाथ खडसे व आता पंकजा मुंडे यांना ज्या प्रकारे भाजप त्रास देत होत व आहे. तर हे बहुजनांचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपने काय केलं हे देशातील जनता जाणून आहेत. यामुळे भाजपचा आणि बहुजनांचा दुरून दुरूनही संबंध नाही असे वक्तव्य नाना पटोले यांनी आज खामगाव येथे केला आहे.

*हे सरकार येत्या डिसेंबर मध्ये कोसळणार*

हे ईडीचे सरकार असून राज्यातील हे सरकार येत्या डिसेंबर पर्यंत कोसळणार असल्याचंही सूतोवाच नाना पटोले यांनी आज केला आहे .ईडीचे सरकार हे जास्त दिवस टिकणार नसून डिसेंबर मध्ये या सरकारचा अंत होणार असल्याचही भविष्य त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles