विद्यार्थीप्रिय मुलायम सिंग यांचे निधन

विद्यार्थीप्रिय मुलायम सिंग यांचे निधन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उत्तप्रदेश : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. ते उत्तर प्रदेशातील विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जायचे. ब्लड प्रेशर, युरिन इन्फेक्शन आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने मुलायम सिंह यांना काही दिवसांपूर्वी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. प्राध्यापक ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदापर्यंतचा मुलायम सिंहांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

*इटावा येथे सामान्य कुटुंबात जन्म*

उत्तर प्रदेशातील इटावा येथे 22 नोव्हेंबर 1939 रोजी एका सामान्य कुटुंबात मुलायम सिंहांचा जन्म झाला. मुलायम यांनी पेहलवान व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती. मात्र मुलायम शाळेतील शिक्षक उदय प्रताप सिंह हे शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रेरित करायचे.

*जैन इंटर कॉलेजमधून बॅचलर ऑफ टीचिंगची डिग्री*

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलायम यांनी 1955 मध्ये मैनपुरीतील करहल स्थित जैन इंटर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 1959 मध्ये त्यांनी या कॉलेजमधून बॅचलर ऑफ टीचिंगची डिग्री घेतली आणि 1963 मध्ये या कॉलेजमध्ये ते 120 रुपये महिना पगारावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. हायस्कूलमध्ये हिंदी आणि इंटरमध्ये सामाजिक विज्ञान विषय शिकवायचे. नोकरी करता करता त्यांनी आग्रा युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्स विषयातून एम पूर्ण केले.

*असा होता राजकीय प्रवास*

मुलायम सिंहांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत एकदम वेगळी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुलायम सर आवडते होते. मात्र काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर मुलायम सिंहांनी राजकारणात प्रवेश केला. 1967 मध्ये ते उत्तर प्रदेशातील जसवंत नगर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. आपल्या राजकीय प्रवासात मुलायम सिंह 8 वेळा आमदार आणि 7 वेळा लोकसभेचे खासदार होते. तसेच 1996 ते 1998 पर्यंत ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles