
शेवटी आमचाच विजय झाला; ठाकरे गटास ‘मशाल’ चिन्ह भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रीया
मुंबई: राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. अशातच दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेऊन ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे. तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह आम्ही मागितले होते. मात्र, ते आम्हाला मिळाले नाही. ज्या पक्षाकडे बहूमत असते त्या पक्षाला चिन्ह मिळते. जवळपास ७० टक्के बहूमत आमच्याकडे आहे. राज्यप्रमुख आणि अनेक कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्हाला धनुष्यबाण मिळावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना मिळालेल्या मशाल चिन्हावर बोलताना शिंदे म्हणाले की, मशाल ही अन्यायाच्या विरोधात पेटल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मशाली होत्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या नावाबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा, बाळासाहेबांचे नाव आम्हाला मिळाले, त्यामुळे आमचा विजय झाला, असे विधान त्यांनी यावेळी केले.