राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत न्यू मून शाळेची यशस्वी भूमिका

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत न्यू मून शाळेची यशस्वी भूमिकापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रुखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा,पण कधी कधी गंभीर स्वरूप धारण करणारा आजार आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे व दूषित मातीच्या संपर्कामुळे याचा संसर्ग होतो. त्यामुळे बालकांच्या शारिरिक व वैयक्तिक विकासावर याचा दुष्परिणाम होतो.

नॅशनल डिवाॅर्मिंग डे च्या निमित्ताने केल्या गेलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात 29 टक्के कृमीदोषाचे प्रमाण आढळले आहे, त्यामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटत आहे, बालकांमध्ये आढळणाऱ्या या जंतदोषाचे गांभीर्य लक्षात घेवून तो समूळ नष्ट करण्यासाठी त्या अनुषंगाने 10 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन गोंदियाच्या आरोग्य विभागाकडून जिल्हास्तरावर प्रत्येक शाळेत यशस्वीरित्या राबविण्यात आला.

यानिमित्ताने अर्जुनी/ मोर. येथील न्यू मून इंग्लिश मिडीयम शाळेत प्राचार्य सचिन मेश्राम, प्राध्यापिका तारका रुखमोडे, प्राध्यापक राकेश उंदिरवाडे यांनी मुलांचे चर्चासत्र घेऊन हात स्वच्छ धुणे, शौचालयाच्या वापर करणे, निर्जंतुक व स्वच्छ पाणी पिणे, स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुणे, नखे नियमित कापणे इत्यादी आरोग्य विषयीची माहिती विद्यार्थ्यांना देऊन आरोग्याविषयी सजग राहण्याचे आवाहन केले. 1 ते 6 वयोगटातील व 6 ते 19 या वयोगटातील मुलांना कोरंभीटोला उपकेंद्रातील परिचारिका व अधिकाऱ्याद्वारे जंतनाशक गोळ्यांचे सर्व शिक्षकांच्या समक्ष वाटप करून विद्यार्थ्यांना गोळी खायला लावली. आरोग्य विभागाच्या या मोहिमेत न्यू मून विद्यालयाने शंभर टक्के आपली यशस्वी भूमिका निभावली.

या मोहिमेमुळे देशातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे होतील, रक्तक्षय, अशक्तपणा, कुपोषण व शारीरिक व्याधींवरही आळा बसेल. मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी ही गोळी संजीवनी असून याद्वारे बालकांची आकलनशक्ती सुधारते,अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles