जि.प.प्रा.शाळा, खातखेडा येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन संपन्न

जि.प.प्रा.शाळा, खातखेडा येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भिवापूर: जिल्हा परिषद नागपूर( आरोग्य विभाग)च्या वतीने ” 10आँक्टो.2022 राष्ट्रीय जंतनाशक दिन ” मोहीम राबविण्यात आली. यात राष्ट्रीय जंतनाशक दिन(एन.डी.डी.) हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आला आहे. हा कार्यक्रम फेब्रुवारी व आँगष्ट महिन्यात(राज्य विशिष्ट STH व्याप्तीवर आधारित) अंगणवाडी,शाळा, काँलेजमध्ये एकाच दिवशी निश्चित जंतनाशक(अल्बेंडाझोल)गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या क्रुमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहीमेतील अंतर ६ महीन्यापेक्षा जास्त नसावे. म्हणुनच ,जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम १०आँक्टोंबर २०२२ला आयोजित करण्यात आली.
यात वयोगटातील १ वर्षे ते १९ वर्षोपर्यंतचे सर्वच मुलामुलींना अंगणवाडी केंद्र,शाळा,काँलेज स्तरावर राष्ट्रीय जंतनाशक(अल्बेंडाझोल)गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती,शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा उद्देश आहे.
ही गोळी वय १ ते २ वर्षेपर्यंत (अर्धी २०० मि.ग्रँ.पाण्यात पावडर करुन, विरघळून पाजावी.)तर वयोगट २ -३वर्ष (१गोळी…४००मि.ग्रँ. पावडर करून पाण्यात विरघळून द्यावी),वयोगट ३वर्ष ते १९ वर्षोपर्यंतचे सर्वांना (एक गोळी ४००मि.ग्रँ. चावुन-चावून खाण्यास द्यावी.)

या मोहिमेत प्रा.आ.केंद्र नांद तसेच उपकेंद्र महालगाव यांचे मार्गदर्शनाखाली ही मोहीम जि.प.प्रा.शाळा खातखेडा (अंगणवाडी)येथे राबविण्यात आली. यात सहभागी सौ.संध्या शेगोकर(मु.अ) आयु.राजू लहुजी नवनागे(स.अ) श्रीमती आशा शेरकी(अं.सेविका),आयु.समिक्षा राजेंद्र कांबळे(आशा.पर्यवेक्षक),आयु.मनीषा सुमीत डांगे(आशा)सौ.मंदा सुधीर मसराम(शा.व्य.स.सदस्य) तसेच सर्व विद्यार्थी हजर होते.अशप्रकारे ही मोहीम राबविण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles