
वसुधा नाईक यांच्यातर्फे महिलांना ‘वस्त्रदान’
पुणे: आज दि.१२/११/२०२२ रोजी आर्थिक परिस्थिती बेताची असणार्या व वर्षातून अगदी दोनच साड्या घेणार्या भगिनींना साड्यांचे वाटप केले. दिवाळी मधे कपाट आवरायला काढले.जवळजवळ दोनशे साड्या निघाल्या असतील.
त्यात काही खूप आवडिच्या पण सध्या काठपदर साडी तनूवर नको असणार्या अशा वीस साड्या काढल्या ज्या साड्या पाच वर्ष झाली अगदीच वापरणे कमी केले होते.
परवा कामवालीशी बोलताना जाणवले की तिने चार वर्षात साडीच घेतली नाही.मग मी विचार केला.साड्या अशा पडून राहण्यापेक्षा कोणाला तरी उपयोगी होतील.या विचारातून हे ध्येय साधले.
अशा आज सतरा साड्यांचे वाटप केले. एकजण खूप गरीब आहे.ती गावी असते.तिला यातील पाच साड्या माझी कामवाली+ माझे माजी पालक रेश्मा अडसूळ पोहोचवणार आहे.
या साड्यांची किंमत अगदी एकहजार ते तीन हजार पर्यंत आहे.
माणसाला मोह सुटता सुटत नाही हे खरे.ही साडी नवर्याने वाढदिवसाला घेतली,दिवाळिला घेतली.या मोहजालात अडकणे आता नाही.
आपल्या अावडिच्या साड्या दिसू दे या भगिनींच्या तनूवर साड्या देताना मला खूपप आनंद झाला.तर घेताना त्यांच्या मुखावरुल आनंद ओसंडून वाहत होता.
आनंद या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
हा सुगंध सदा वाटप करावा….