
तीन सवाल – एक जवाब! गुड मॉर्निंगची सुप्रभात!
निरंजन मार्कंडेयवार, नागपूर
(महाराज चिंताग्रस्त मुद्रेने सिंहासनावर बसलेले. हाती मोबाईल घेऊन त्याकडे बघताहेत.
तोच त्यांचा डियर डार्लिंग बारक्या प्रधान दरबारात प्रवेश करतो.)
बारक्या प्रधान : महाराजाईचा विजय असो! विजय असो! दे दणाण अन घे सनान असो!
महाराज :बारक्या! कायले परेशानी वाढवतं रे आमची?
बारक्या प्रधान : च्या पित्तरले! का झालं जी?
महाराज : का म्हंजी? तू आमचा परधान! अन हे का सुरू हाय येथी?
बारक्या प्रधान : कोठ जी? का सुरू हाय?
महाराज : हे सुप्रभात! हे गुड मॉर्निंग! आरे, हे मेसेज हो का, का हो! आमच्या राज्यातल्या लोकले
कामधंदे नसे का? हे मोबाईलमंदले फुलं येचू-येचू डोसक्या फिरू-फिरू झाला आमचा!
बारक्या प्रधान : कूल म्हाराज कूल! पॉझिटिव्ह रावा! त्यात सुविचार असतेत. फ्रेश आयडिया रायतेत.
महाराज : आरे, पर आमचे बोटं दुखू-दुखू जातत, टाईम बी वेस्ट व्हते.
बारक्या प्रधान : बोटाले व्यायाम व्हते म्हाराज! टाईम वेस्ट नाय त इन्व्हेस्ट व्हते.
महाराज : तू कनाई खोपडा नग सरकावू.
बारक्या प्रधान : मले थेच धंदे हाय काय?
महाराज : बरं! बरं! माये तीन सवाल हाये! सवाल नंबर येक. हे लोकं मले डेली फुलंच पाठोते… काऊन?
सवाल नंबर दोन. यायचं येढो बेज्जा पिरिम आसन आमच्यावर, तमंग हे लोग डायरेक्ट फोन कायले
करत नाय? आन सवाल नंबर तीन! याच्या मांग का सायकॉलॉजी असन बारक्या?
बारक्या प्रधान : एकच जवाब हाय म्हाराज! आन तुम्हाले हा जवाब उद्याच
माया गुड मॉर्निंगच्या मेसेजमंदी भेटून जाईन !
महाराज : ऑ?
©निरंजन मार्कंडेयवार
9021926337