६१वी राज्य नाट्य स्पर्धा; १६ नोव्हेंबरपासून नागपूर केंद्रावर १८ नाटके

६१वी राज्य नाट्य स्पर्धा; १६ नोव्हेंबरपासून नागपूर केंद्रावर १८ नाटके



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६१वी महाराष्ट्र राज्य नाट्य हौशी मराठी स्पर्धा २०२२- २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर केंद्रावर ही स्पर्धा दि. १६ नोहेंबर २०२२ ते ५ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. नागपूरमधील सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे . या स्पर्धेत दररोज एक नाटक सादर होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘पैदागीर’ चित्रपटाच्या निर्मात्या वंदना जीवने यांच्याहस्ते सायंकाळी ६.३० वाजता होईल. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘पैदागीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जीवने, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूरचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, अखिल भारतीय नाट्य परिषद महानगर शाखा अध्यक्ष सलीम शेख असतील. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles