‘ती’ची आस विषयावरील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🔥विषय : ‘ती’ची आस🔥*
*🔹गुरूवार : १७ / ११ /२०२२*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*’ती’ची आस….!!*

*लागे ‘ती’ची आस*
*येता ऋतू हिवाळा*
*सजवण्या मैफिली*
*सान थोरांचा मेळा*

*✍️श्री अरविंद उरकुडे, गडचिरोली*
*©मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*चित्र चारोळी–ती ची आस*

गोड गुलाबी थंडीत
लागे ती ची आस
वाटे ऊबदार शेकोटी
असावी आसपास

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*’ती ‘ची आस..!*

लागली मनाला कधीची
‘ती ‘ची आस..!
थंडीच्या या दिवसात
शेकोटीच खास

*बी. आर. पतंगे (beeke)*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*ती ची आस*

गाराठल्यावर पेटीता शेकोटी
अजूनही ती ची आस लागते
होरपळून निघाला जीव जरीही
वेडे मन तिचीच वाट बघते

*इंदुमती कदम गंगाखेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार* *समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*ती* ‘ ची आस….

जळते स्वतः, ऊब दानाते
जवळ तिच्या का बसू नये
ऊर्जा भरते,आशा पल्लवीते
‘ती ‘ ची आस का ? असू नये

*जितेंद्र ठवकर ,अर्जुनी /मोर*
जिल्हा – गोंदिया
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*’ती’ ची आस*

थंडीने हुडहुडी भरून
गारठतो जेंव्हा श्वास
ऊब मिळवण्यासाठी
लागते ‘ती’ची आस

*सौ संगिता साळुंखे*
ता जि सातारा
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
* ‘ ती’ ची आस…!!!*

शेकोटीची ऊब अन्
तिच्या आठवणी…
मनास ‘ती’ची आस
अन बहरे रातराणी…

*सौ पल्लवी कोंडेकर,पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*”ती “ची आस*

थंडी पसरता दूरवर
लागली मनाला “ती”ची आस…
शेकोटीची मिळता ऊब
गुंतू लागला तिच्यातच श्वास

*सौं. वंदना राजेंद्र सोरते*
जि. गडचिरोली
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*

➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿

*’ ती ‘ ची आस*

थंडीने गाठता उच्चांक
वाटे ‘ती’ ची आस सर्वां
जमा सारे तिच्यापाशी
मिळे ऊब न थंडीची पर्वा

*सौ. श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*ती ची आस*

थंडी दुरवर पसरता
मनाला लागली ती ची आस
मिठीत तुझ्या शिरता
गुंतू लागला श्वासात श्वास

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*’ती ‘ची आस*

थंडी मस्त गुलाबी
तनुस शहारा खास
ऊब मिळावी म्हणून
लागते ‘ती’ ची आस…..

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*’ती’ ची आस….!!*

हवेत शीतलहरी येई…
ऋतूबदलाची वाटे नवलाई….
अंगात हुडहुडी या भरली…
तव ‘ती’ची आस जाणवली….

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*’ती ‘ ची आस*

गुलाबी थंडीची चाहूल
हुडहुडी भरते अंगात ….
लागे मनाला ‘ती ‘ ची आस
शेकोटी पेटते अंगणात…

*विजय शिर्के , छ संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*’ती’ ची आस…!!*

काड्या लाकडं करता गोळा
रंगले थंडीत मैफिलीचे सत्र
लागताच ‘ती’ ची आस आम्हा
गुजगोष्टी साथीला ऊबदार रात्र

*सौ माधुरी प्रकाश काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥💕🔥➿➿➿➿
*ती’ ची आस……!!*

गारव्याने होती सगळे थंड
सारे करती ‘ती’ ची आस
करूनी लाकडासाठी बंड
म्हणून असते शेकोटी खास

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles