न्यु मून शाळेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया: स्थानिक अर्जुनी /मोर –
इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अर्जुनी/ मोर येथे दिनांक 15/ 11/ 2022 रोजी, आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणारे.. जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध विद्रोह करणारे.. आदिवासींचे क्रांतिसूर्य शहीद बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तारका रुखमोडे यांनी दीप प्रज्वलन करून माल्यार्पण केले. अध्यापिका हिना लांजेवार यांनी मुंडा यांची जीवनगाथा सांगितली. बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित नाट्यात्मक नृत्याचे सादरीकरण करण्यात आलं.अध्यापिका लिना चचाने यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. तसेच या दिवसाचे औचित्य साधून केंद्रप्रमुख श्री.सुरेश भैसारे यांनी शाळेला स्नेह भेट दिली. त्यांचेही तारका रुखमोडे व राकेश उंदिरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे प्रा.उंदीरवाडे, श्री.बांडे, त्रिवेणी थेर, लिना चचाने,कुंजना बडवाईक, प्रतीक्षा राऊत,असा समस्त न्यु मून शिक्षक परिवार उपस्थित होता. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन केले.