किमान वेतन व भाऊबीज करता सीटू तर्फे आशांचा विधानसभेवर विशाल मोर्चा

किमान वेतन व भाऊबीज करता सीटू तर्फे आशांचा विधानसभेवर विशाल मोर्चा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_हिवाळी अधिवेशनात १९ डिसेंबर ला पहिल्याच दिवशी धडक_

नागपूर: आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( सी आय टी यू) नागपूर जिल्हा तर्फे गुरुदेव सेवाश्रम सभागृह येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कॉ.राजेंद्र साठे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिबिराच्या मार्गदर्शक जिल्हा आशा समन्वयक -मयुरी साळवे यांनी आशा वर्कर्स यांना कामकाजाची पद्धत, मोबदला, नवीन पी आय पी चे काम समजावून आशा व गटप्रवर्तक यांचे अडचणी ऐकून त्या कशा सोडवल्या जातील यावर मार्गदर्शन केले.

जिल्हा महासचिव -कॉ.प्रीती मेश्राम यांनी कामाची जिम्मेदारी व महत्व सांगितले. सीटू अध्यक्ष – कॉ. मोहम्मद ताजुद्दिंन यांनी संगठनात्मक माहिती व उद्दिष्ठ सांगितले. कॉ. राजेंद्र साठे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या अधिकाराकरता लढण्याची पद्धत सांगून किमान वेतन तसेच भाऊबिज करता केलेल्या लढ्याची आठवण देत परत १९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विशाल मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठेऊन त्याला पारित करण्यात आले.

कार्यक्रमाला सीटू जनरल सेक्रेटरी -कॉ.दिलीप देशपांडे, शहरी आशा समन्वयक -रेखा निखाडे,सिकल सेलच्या- संजीवनी मॅडम, रंजना पौनीकर, माया कावळे, आरती चांभारे, मंदा गांधारे, लक्ष्मी कोत्तेजवार, अंजू चोपडे, अर्चना कोल्हे सह शेकडो आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles