जि. प. शाळा अडेगाव येथील ‘किशोर भोयर’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
गोंडपिपरी : मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या संयोजनातून लातूर ( महाराष्ट्र )येथे आयोजित ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२२’ प्रकाशन सोहळा आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत जि. प. शाळा अडेगाव येथील शिक्षक किशोर बालाजी भोयर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयोजित प्रकाशन समारंभास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिजाऊ ब्रिगेड सिल्वासाच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सविता पाटील ठाकरे, संस्थेचे विश्वस्त अरविंद उरकुडे आणि डॉ. सुनील गायकवाड माजी खासदार लातूर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, मेडल आणि साहित्यगंध दीपोत्सव अंक तसेच मानपत्र यावेळी किशोर भोयर यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सपत्निक पुरस्कार स्वीकारतांना सौ रेखाताई भोयर, दिनेश भोयर व सूरज भोयर त्यांचे चिरंजीव आदी उपस्थित होते.