🫧’हा’ स्नेह दवबिंदूचा🫧; तारका रूखमोडे

🫧’हा’ स्नेह दवबिंदूचा🫧; तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण_

भिजली पाने
जशी दवबिंदूने
थेंब कोरडा

🌷ऋतुचक्रातील गर्द धुक्याची पुन्हा पहाट प्रसवली.. थंडीच्या अस्तित्वाची चाहूल लागताच कुसुमांवर दवबिंदूची सुंदर माळ अवतरली.. पांघरता दवबिंदूने अलवार शुभ्र दवाचा शेला.. सुमनांवर चढला जणू प्रीतीचा रंग नवा.. हिम अस्तित्वाच्या अलवार गोड स्पर्शाने सदाफुली अधिकच खुलली,मोहरली, रोम रोमी चैतन्यात न्हाली.. बघुनी सदाफुलीच्या मोहक पाकळ्यांचे सोज्वळ रुपसौंदर्य दवबिंदूही त्यावर विसावले. पडता रवीकिरणे सोनेरी जाहले, मोत्यासम निखरले.

🌤️खरंच, किती विलक्षण! आणि वास्तव नं !! दवबिंदूचं जीवन क्षणभंगुर..तरीही अल्पकाळ जीवित्व प्राक्तनाचे दुःख न मानता, मिळालेलं जीवन आनंदे भरभरून जगून घेतो, कोमल पाकळ्यांवर स्थिरावतो, त्याला सुशोभित करूनच विलीन होतो… फुलाचंही आयुष्य घटकाभराचंच… पण तोही सर्वांच्या मनचक्षूंना सुखावून जातो, कुणाचा तरी देव्हारा सजवितो. दवबिंदूंचं त्याच्या आयुष्यात येऊन घडीभर निर्मळ पारदर्शी मनानं मोती बनून कोमल तनूवर चमकणारं रूप मनाला भावणारं.. दोघेही एकमेकांकडून सजतात.. सारं काही निर्व्याज, निखळ देणं ,क्षणभंगुरत्वाचा दुःख न करता ..आनंदाचा सोहळा करून.. जगण्याचे जणू जीवनसार सांगून जातात ..बरेच काही शिकवून जातात ..

आपल्या आयुष्याचंही असंच असतं, वेगवेगळ्या भाव माणसांनी जीवन सजलेलं.. अशीच जीवन प्रवाहात काही सुंदर नाती अचानक दवबिंदू होऊन येतात .. मनाला केवळ आणि केवळ निखळ आनंद देऊन जातात.. आयुष्यातील रूक्षपणा घालवणारे हे दवबिंदूरूपी स्नेही अल्पकाळासाठी आले तरीही..मोत्यापरी जीवनातील काही क्षण उजळून जातात.. क्षणीक का होईना आयुष्यभर सोबत राहतात… सुखावतात आठवाच्या रूपात निर्मळ शीतल चंद्र प्रकाशासारखे मनाला तृप्तता प्रदान करत!!!..

🌈किती साधं.. पण तरीही सुंदर, जीवन कसं जगावं हे सांगणाऱ्या भावाशयाचं निर्मळ बोलकं सदाफुलीचं चित्र बिनवासाचं म्हणून जरा दुर्लक्षितच..तरीही फुलांचा मोसम नसतानाही तो फुलतो तेव्हा देव्हारा सजवणारं..दवबिंदूंना अलवार जपणारं आ.राहुल सरांच्या संवेदनशील कविमनाच्या दृष्टोत्पत्तीतून न सुटलेलं ,साधारण फुलातही कवीने भावाशयाचे रंग भरावेत म्हणून सरांनी हे चित्र कदाचित दिलेलं.. आणि आपापल्या सौंदर्यदृष्टीने सर्व सारस्वतांनी व्यक्त होऊन सदाफुलीला आपल्या प्रतिभेत शब्दमोत्यांनी सुंदर सजवलेलं.. अशीच हायकू काव्यमाला गुंफत रहा.. सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

थोडंसं मनातलं-
तिसऱ्या ओळीत कलाटणी देताना व्यापक आशयाची अनुभूती येऊ द्या..

आ.राहुल सरांनी मला हायकू काव्यपरीक्षण लेखणाची संधी दिली त्याबद्दल हृदयस्त ॠणानुभार 🙏

सौ. तारका रूखमोडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
कवयित्री/ संकलक/ परीक्षक
©️ मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles