‘काजव्याची रात’ शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : काजव्याच्या राती☄*
*🍂शनिवार : १९ / नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*काजव्याच्या राती*

होतीस तू उभी एकटी
घेत उन्हे कोवळे
मोकळ्या कुंतलामधुनी
जल गाली ओघळे..

येता तेव्हा झुळूक जराशी
विखुरले घन सावळे
दिसताच तव मुखचंद्रमा
हे नयन तिथे भुलले..

जड पावली जरी वळालो
मन तिथेच गं घुटमळे
तू स्वप्न आहे की सत्य
मज काहीच ना ते कळे..

घेऊन घिरट्या तव सदनाशी
झाला माझा भ्रमर..
तासा मागून तास सरले
शोध तुझा दिसभर..

तुज इशारा न कळला
दिन आशेचा मावळला
मिरवीत चवथीची कोर
बघ चंद्रमाही ढळला..

अशाच एका संध्यासमयी
झाली ओझरती भेट
का रे असा तू दिसशी येथे
सवाल केलास थेट…

कधीतरी उमगेल तुजला
या हृदयीची प्रिती
दिप मनी पेटवीत आहेत
काजव्याच्या राती…!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या वाती*

भयावह रात l रान घनदाट l
अनोळखी वाट l शांततेची ||१||

चांदण्यांचा मळा l काजव्याच्या वाती l
अनोळखी नाती l सोबतीला ||२||

अंधाऱ्या प्रवासी l मिळतो चकवा l
सोबत काजवा l भीती नसे ||३||

डोळ्यात दिसतो l तोच तो अंधार l
नव्हती माघार l संघर्षाची ||४||

काजव्याच्या वाती l निःस्वार्थ पेटती
प्रकाश वाटती l उमेदीचा ||५||

होऊनि काजवा l दाखवू प्रकाश l
निर्मूया विश्वास l डोळ्यात ||६||

मनोभावे कर्म l असावे निःस्वार्थ l
खरा परमार्थ l जीवनाचा ||७||

*कुशल गोविंदराव डरंगे, अमरावती*
*@सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

काजव्याच्या राती
दिसे आकाश सुंदर
राहावे निरंतर
सदोदित||१||

चमचमते काजवे
त्यांचा अनमोल प्रकाश
दिसे यथावकाश
डोळ्यांना||२||

पायी चालताना
प्रकाशाचा असे सहवास
निसर्गामध्ये वास
कायमचा||३||

अंधारल्या राती
काजव्यांची साथ असे
मनामध्ये वसे
सोबत||४||

लुकलुक करत
पहा कसे उडतसे
प्रकाश पडतसे
वाटेवरी||५||

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समुह सदस्य*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

काळजी करे हुरहूर
घेण्या मिठीत तिला
चांदण्यांनी चादर पसरविली
काजव्याच्या रातीला

मनात उत्सुकता भरली
शब्दही ओठात दडले
पापण्यांनीही दिले उत्तर
होते केव्हाच मला ते कळले
जवळ जाऊनी अलगदच
स्पर्श तिला केला
चांदण्यांनी चादर पसरविली
काजव्याच्या रातीला

घेऊनी आता कवेत
रमणार होतो तिच्यात
काय होते मनात तिच्या
ना ओळखू शकलो क्षणात
पदर पसरवूनी तिने
मला वचन मागितला
चांदण्यांनी चादर पसरविली
काजव्याच्या रातीला

घेऊनी वचन तिने
मला बंधनात अडकवले
याचं जन्मी नाही तर तुम्ही
हवे सात जन्म बोलले
प्रेमात मी तिच्या
माझं काळीज हरपला
चांदण्यांनी चादर पसरविली
काजव्याच्या रातीला

असेही असते का प्रेम ते
मला होते आता कळले
बघता तिच्या नयनात
अश्रू दाटून आले
लावला होता तिने
मजवर इतका लळा
चांदण्यांनी चादर पसरविली
काजव्याच्या रातीला…..!

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

पेटल्या ह्रदयी
लक्ष लक्ष वाती
वाटूली पाहतसे
काजव्याच्या राती

थकली वाट
डोळा दाटे पाणी
केला साज श्रृंगार
परि वाटे विरहिणी

चाहूल कशाची
सैरभैर नयन
नसे तू कोठे
विचलित मन

आस मनी वाहे
स्वप्नात रंगले
लाजून स्वतः च
अंधाराला बिलगले

हळूच तो काजवा
चमकून गेला
तू नसल्याची खंत
मनी ठेवून गेला

ये वेगे सख्या
जाण ओढ किती
नको रे दुरावा
काजव्याच्या राती

*शर्मिला देशमुख -घुमरे,बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्यांच्या राती*

पावसातील ती गुढ रात्र
आणि अंधाराला सारत
खाचखळगे तुडवत
वाट जवळ होतो करत

वरून झिरपणारा पाऊस
अंधारात किर्र आवाज
घशाला पडलेली कोरड
मध्येच पाखरांचा साज

ओढ्याच्या काठाने जातांना
पानापानातून फुटे प्रकाश
मध्येच उभे बाभळीचे झाड
दिसे फुटणारा उजेड खास

ताऱ्यांची मैफिल धरेवर
बहरली काजव्यांची रात
सोबत रातकिड्यांची तान
तरी रस्ता भासे लांब जात

अडखडले पाऊल माझे
काजव्याच्या उजेडात
हळुच आलास जवळ
आणि धरलास हात

तूझे ते सांभाळून घेणे
तेव्हा किती निरपेक्ष होते
आजही आठवतो तो क्षण
आणि मन गंधाळून जाते

*सविता धमगाये,नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्यांच्या राती*

चिंब चिंब पावसानं
भिजलं हे अवचित रान
हरीत शालूने वसुंधरेनं
झाकलयं बाई तन…..,,

वाटते फेरफटका मारावा
आता या धरेवरती छान
सहलीचे आयोजन करावे
मुले घेतील गाण्याची तान….

वाट डोंगरातून जाईन
घाटाघाटातून गाडी फिरेन
निसर्गाचे रूप पाहण्यात
अंतर सार्‍यांचेच रमेल….

अंधाराच्या रातीत दिसेल
रंगीत लाल लाल माती
चांदण्यासम भास असतील
काजव्यांच्या राती,काजव्यांच्या राती….

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

किर्र काळोख्या रानावनात,
रातकिडे भयावह गाती…
अश्या भयाण स्थितीत असे,
सोबतीला काजव्याच्या राती…१

डोंगर दऱ्याखोऱ्यात भासे,
प्रकाशणारा मंद प्रकाश…
धावत चालली बघा कैसी,
पेटणाऱ्या दिव्याची आरास… २

अंधारलेल्या वाटेला असे,
अंधूक उजेडाची ही साथ…
निभावून मित्रत्वाचे नाते,
चाले घेऊन हातात हात…३

कुणी असो नसो सोबतीला,
काजवे दावी सुकर वाट…
जपून जिवाभावाचे नाते,
पार करून देतसे घाट…४

उजाडल्या काजव्याच्या राती,
रोषणाई डोंगराच्या माथी…
*सुधाकरा* प्रकाशाची धुंद,
पेटवीते आशेच्या प्रज्योती…५

*सुधाकर भगवानजी भुरके,गुमथळा, गुमथी,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह,नागपूर*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

अंधारलेल्या मनाला
भावनांची भीती
करतील उद्वेग
काजव्याच्या राती

हातात तुझा हात
जरी पाय रक्ताळलेला
नव्हती भीती कशाची
होता श्वास गंधाळलेला

तुझा अविश्वास
वाटते काळरात्री
तुटले प्रेम
काजव्याच्या राती

शंका कशा मनात
निस्वार्थ प्रेम केले
अफवा उठल्या जगी
सारेच खाक झाले

ये परतून
करू प्रीति
आठवून त्या
काजव्याच्या राती

*डॉ. संजय भानुदास पाचभाई*
*नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

रक्ताळलेल्या पायांनी
फिरतोय का अनवाणी ?
वृक्षवल्लींच्या छायांनी
सुखावता गातोय गाणी

भाकरीचा चंद्र शोधण्या
काजवा होऊन फिरतो
फळं घामाची चाखण्या
रक्त मातीत जिरवितो

त्या काजव्याच्या राती
निजे धरणीच्या कुशीत
कुदळ,फावडं ते हाती
घाम गाळतोय खुशीत

पिकविता मातीत मोती
स्वप्नं उद्याची रंगवितो
माप नाही त्याच्या हाती
राग पाण्यानं पचवितो

काजव्याची ही फरफट
पाहती कंदिलशून्य लोकं
कर्जानं आभाळ फाटलं ?
कसं बुजवू सांगा भोकं ?

कसं बुजवू सांगा भोकं ?

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

कुठे चालली नटुन थटुन
काजळ ठिपके लेवुन नयनी
काजव्याच्या राती घे भेटुन
नको करू मुड तुझे दयनी !!

चंद्रकोरीच्या आकाराची
लाल बिंदी लावली भाळी
नाकमोळी नथ मोत्याची
काजव्यांची विणली जाळी !!

रोहिणी नक्षत्र लागले
काळरात्र झाली अंबरी
सौदामिनी गडगडली
बरसेल धो धो सरी !!

वनातुन वाटचाल करतांना
काजव्याचे दर्शन झाले
न्युन ओझे नव्हते मनी
मधाळ मनोरंजन झाले !!

*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

“काजव्याच्या राती कधी
तुझी आठवण येत असते”
“मन माझे भेटण्यासाठी
नेहमीच ओढ घेत असते”

“स्वयंप्रकाशित काजवा
तुझ्या दिशेने जात राहतो”
“काजव्याच्या प्रकाशात
तुझ्याकडे मी येत राहतो”

“तू फक्त वाट पाहत बसते
काजव्याच्या राती अंधारात”
“माझ्या येण्याने तुला किती
आनंद होतो त्या भेटण्यात”

“दोघांच्या मिलनात तो
काजवाही किती लाजतो”
“काजव्याच्या राती मला
स्वप्नातही तुझा भास होतो”

” काळ्याकुट्ट अंधारात त्या
काजव्याचा सोबत लाभे”
“तुझी माझे मिलन त्या
काजव्यांच्या राती शोभे”

*✍️ श्री हणमंत गोरे*
*मुपो:घेरडी,ता:सांगोला,जि:सोलापूर*
*(©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह)*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*” काजव्याच्या राती “*

काय सांगु सजनी तुला
माझ्या मनाची गं स्थिती
किती भयावह होती..!
काजव्याच्या या राती

सोडून जाते गं मजला
तुला नाही थोडी भिती
कुठे निघाली एकटी..!
भयावह काळ्या राती

नाही कोणी साथी तुज
कोणी नाही गं सोबती
नको जावू सोडून मज
अशा भयावह राती..!

झालं गेलं माफ कर
तुझा पदर तू सावर
भार नाही कुणावर
आहे जीवन..नश्वर

थोडे ऐकून घे ना राणी
काही नाही या जीवनी
नको फेरुस तू पाणी..!
हाक देते केविलवाणी

एकदा कर तु विचार
नको होवू गं बेजार..!
आहे माझी तुला साथ
जशी दिव्यातील वात

नकोय असा हट्टीपणा
काय चुकले ते सांग ना
करु या दोघेही दुरुस्ती
सात जन्माचे सोबती

नको सोडू साथ माझी
आहे भयानक स्थिती
होईल जिवाची दुर्गती
या काजव्याच्या राती

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

कैक काजव्याच्या राती
पाहिल्या चमचम शेताती
मोहरू गेले मन माझे
प्रेमाचा माझा सोबती ॥१॥

मंद प्रकाश काजव्याचा
चंद्राचा तो दोस्त असतो
माणसांचा मित्र असतो
वाटसरूंचा वाटाड्या असतो ॥२॥

अंधाराचा जीवलग असतो
नक्षत्र तारकांचा प्रेमी असतो
लहानांचा तो दिवा असतो
एकांताचा सोबती असतो ॥३॥

शेताचा तो राखणदार असतो
शेतकऱ्याचा सहकारी असतो
निरव शांततेचा ध्वनी असतो
श्वापदांचा तो शत्रू असतो ॥४॥

स्वयंप्रकाशित कीटक असतो
जनांचा कल्याणकारी असतो
बालकांचा सवंगडी असतो
काव्यात अलंकार असतो ॥५॥

सर्वांचा तो आधार असतो
पृथ्वीची ती शोभा असते
विश्वाचं ते लेण असते
देवाचं ते देण असते ॥६॥

*© श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌺🔥🌸➿➿➿➿
*काजव्याच्या राती*

डोंगरी भाग,
एकांत,
काजव्याच्या राती….,
तू आणि मी,
चमचमत तरुवरती काजवे,
आपुल्यासाठी,गाणी गाती….!
कितीदा आलो,
बसलो, रमलो,
काजव्याच्या राती…….,
पाहिली स्वप्न,
घेऊनीया,
हात हाती……!
चमचमणाऱ्या,
तारका आकाशी,
तसे काजवे अवनीवरती….,
एकाच नाण्याच्या दोन बाजू,
कुणी खाली चमकती,
कुणी भुवरती…….!
“अत्त दीप भव,”
सांगती काजवे आम्हा,
काजव्याच्या राती…….,
देऊनिया वचन,
घेतली आपण शपथ,
उजळूया जगी,जीवनज्योती…!!!

उजळूया जगी,जीवनज्योती…!!!

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles