
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🥀विषय : विश्वासाची वीट🥀*
*🍂बुधवार : २३/ नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विश्वासाची वीट*
कुणाच्या भावनांशी खेळण्याआधी खुप विचार करावा
कुणाला फासात अडकवण्याआधी खुप विचार करावा
हळवे असतात कुणी, नी कुणी असतात साधे भोळे
फक्त मन कुणाचं दुखवण्याआधी खुप विचार करावा
विश्वास तो पक्षी आहे उडाल्यावर पुन्हा परतत नाही
म्हणुन विश्वासघात करण्याआधी खुप विचार करावा
नजरेची असते काही भाषा नजरेनेच ती कळते भाषा
स्वतच्याच नजरेतून पडण्याआधी खुप विचार करावा
एका क्षणात स्थिरावलेल मन चलबिचल होवून जातं
कुणाच्या मनातून उतरण्याआधी खुप विचार करावा
विश्वासाची वीट एकदा खचली की खचत जाते भिंत
म्हणून आधार तीचा होण्याआधी खूप विचार करावा
*मोहिनी निनावे*
आनंद नगर, नागपूर.
*©️ सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
प्रेमळ घर बांधण्या,
असावी विश्वासाची वीट…,
विश्वासाने विश्वासावर विश्वासून,
संसार करावा नीट…..!
त्याच घरासाठी,
प्रेमाची असावी रेती….,
प्रत्येकजण प्रत्येकालाच जिथे,
प्रेमाने साथ देती…..!
तेच सदन उभारण्या,
वापरावे आपुलकीचे गज…,
आपुलकीने पै-पाहुण्यांची,
असेल जिथे गजबज….!
त्याच घराच्या बांधकामासाठी,
मिठासपणाचे असावे पाणी…,
रसनेच्या गोडव्यामुळे,
घर गाईल गोड गाणी…!
असे सदन बांधण्या,
आत्मविश्वासाचे घ्यावे सिमेंट..,
विश्वासाच्या वीटेवरील घराला,
द्यावे आनंदाचे पेंट……!!!
द्यावे आनंदाचे पेंट……!!!
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
संयुक्त कुटुंब वत्सल
विश्वासाची ढाल
धन संपत्तीच्या लोभाने
चालतात स्वार्थी चाल
गैर समज पणाचे डोके
असतात उंचावर
उलट सुलट बोलून
धरती असतात धारेवर
विश्वासातल्या नात्यांना
जात असतो तडा
नाते समंधा. मध्ये
निर्माण होतो राडा
अरे जागवा आत्मविश्वास
जगा ताठर मानेने
प्रेमाचे. बिज पेरून
वागवा सर्वांना आदराने
अश्वाविश्वासाने जाणवतो
सुंदर संसारावर संकट
नात्यांना घट्ट बांधून
मजबूत करा विश्वासाची विट
रक्ताचे नाते असतात नाजूक
जपावे फुलासारखे त्यांना
प्रेमाचा खतपाणी घालून
विश्वासाच्या चौकटीत बसवा सर्वांना
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नये)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
कुठे कुठे लावू/विश्वासाची वीट
सारे झाले धीट/भ्रष्टाचारी
सावकारा घरी/ठेवले तारण
आमचे मरण/ठायी ठायी
सरकारी बाबू/आला दारामंदी
केली त्याने चांदी/आपलीच
विश्वासाने केले/आम्ही मतदान
म्हणे तुम्ही कोण/ नेते पाहा
सत्तेसाठी केला/खोका व्यवहार
जनता लाचार/जागोजागी
विश्वासाची वीट/पंढरीच्या दारी
करू आम्ही वारी/संज्या म्हणे
*डॉ. संजय भानुदास पाचभाई*
*नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
विश्वासाच्या विटेवर
बापाच्या पाउलखुणांवर
संसाराची पक्की भिंत
बांधली सखे समवेत
तन, मन, धनाने
चालत होतो मनाने
प्रगती पदावर चालतांना
ठेच लागली मनाला
पाऊलखुणा कुठे दिसेना
पाऊलवाटा कुठे जुळेना
दुभंगले सारे विश्व
गुदमरतो येथे श्वास
बांधेल कशी साखळी
विश्वास विटेची पाकळी
विश्वास ठेव ‘बा’ माझ्यावर
खंबीर उभा मी पाऊलांवर
जुळवुन एक-एक वीट
कुटुंब सजवून नीट
एक मेका विश्वास संपादु
विश्वासाची वीट उभारू.
*सौ.रंजना ब्राम्हणकर*
*अर्जुनी/मो.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
मजल्यावर मजले चढतात
मोठमोठे बंगले उभारतात
गगनचुंबी इमारती दिसतात
थरावर थर भिंती सजतात
माती,पाणी,राख मिश्रणाचा
केल्या जातो भलामोठा गारा
पहाटे पासून दिसभर राबतो
कुटुंबासह कामगार बिचारा
साचेबद्ध करून आयताकृती
एकजीव बनवतोय मातीची
वीटभट्टीतुन तावून सुलाखून
प्रसवना खणखणीत विटेची
विश्वाची वीट असते मातीची
तरी नाते जपते ऋणानुबंधाची
घराला घरपण टिकवून ठेवी
शिकवण मानवा नातेबंधांची
वीटभट्टी कामगार वीटभट्टीवर
जीव ओतून कष्ट,घाम गाळतो
फलित त्याच्या श्रमाचे भेटते
रोजीरोटीचा प्रश्न,त्याचा सुटतो
*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*” विश्वासाची वीट “*
विश्वासाची वीट बांधली
या विश्वासाच्या नात्याने
अविश्वासाने घात केला
अकलेच्या पोकळ वास्याने
जुळले नाते विश्वासाचे
खेळ खेळला पाप्याने
डाव फसला आयुष्याचा
कैद केले जणू फास्याने
गोडीगुलाबीने नाते जुळले
स्वप्नातील त्या आशेने
झाले स्वप्न चकनाचूर
आघात झाले विश्वासाने
*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
आयुष्याचा हा प्रवास
असो किती अडचणी
करू सुखाचा संसार
खाऊ भाकर चटणी
विश्व अनोख दोघांचं
ऊन सावलीचा खेळ
वचनांचे दोघे साक्षी
देऊ एकमेंका वेळ
कमी अधिक होईल
मिठ एखाद्या दिवशी
जुळवून घेऊ भाव
नाते मनाचे मनाशी
होत राहील संसारी
छोटी मोठी हि भांडणे
संसाराच्या या बागेत
आनंदाने गाऊ गाणे
नांदू दोघेही सुखाने
घेऊ स्वप्नांची भरारी
रचू विश्वासाची वीट
बांधू प्रेमाची नगरी
*कुशल गोविंदराव डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
चिमणी चोच चिमणा चारा
मातीचाच केला गारा
कणाकणाने माती वेचून
तयार केला सारा पसारा
घरकूलासाठी जागा शोधली
तयार छान स्वच्छ केली
आजूबाजूचे तण काढले
पाणी शिंपून सपाट केली
पै पै काढून कर्ज
जमावाला निधी खरा
जुळवाजुळव साहित्याची
घराला आकार येईल बरा
तूझ्या माझ्या प्रेमाची
रचली विश्वासाची वीट
घरकूल आपले छान छान
काढून घे ग हळूच तीट
तूला आवडते ना अंगण
घरासमोर छोटीशी बाग
घरकूल नव्हे हे तर प्रेमकूल
राणी नको धरूस राग
*सविता धमगाये,नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💕📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*
जन्मापासून मिळालेली
नात एक अमूल्य ठेव
भावनांच्या धाग्यांनी
गुंफलेल वस्त्र एकमेव
मऊ रेशमी वस्त्राचे ह्या
असतात अनेक पदर
प्रत्येकाने एकमेकांचा
करावा लागतो आदर
स्वार्थ आणि मत्सराने
आकसतात नात्यांचे धागे
दुखावून आपल्या माणसाला
कुणाचे झाले की भले?
स्वार्थ आणि विश्वासघाताने
डळमळीत होतो नात्याचा पाया
नात्यांच्या माणसांपेक्षा जेव्हा
श्रेष्ठ वाटते मोहमाया
विश्वासाची वीट करते
भावनांचे घर साकार
प्रेम विश्वास आपुलकी
देते नात्यांना आकार.
*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖