बुधवारीय काव्यरत्न चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पंधरा🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : विश्वासाची वीट*🥀
*🍂बुधवार : २३ / नोव्हेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विश्वासाची वीट*

विश्वासाची वीट रचून
मजबूत घर बनले
नात्यातल्या विश्वासानेही
घट्ट ऋणानुबंध जुळले….

*सौ. ललिता कोटे,डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

विश्वासाची वीट रचण्यासाठी
असावा प्रामाणिकपणा
दृढ विश्वासासाठी स्वभावात
असावा पारदर्शीपणा

*सौ.प्रांजली जोशी विरार ,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

विश्वासाच्या विटेवार
संसाराचा गाडा चालतो
आपसातील मतभेद विसरून च
नात्यांचा गोडवा टिकतो

*मायादेवी गायकवाड (मानवत )परभणी*
*©सदस्यां, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

विश्वासाची वीट बांधली
एका घट्ट धाग्यांनी ती
स्वप्नाचा झालाय चुरा
कशी दुरावली नाती ती

*सौ पुष्पा डोनीवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नये)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

विश्वासाची वीट
अशी रचावी नीट
ती बसेल फीट
नसेल कुणाची किटकिट.

*श्री. दिपककुमार सरदार*
मु + पो. किनगांवजट्टू
ता. लोणार जी, बुलढाणा.
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

विश्वासाची वीट
आत्मबल वाढवते
स्नेहाच्या नात्याला
रोपट्यासम फुलवते

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

माणुसकीच्या गावाला
वीण नात्यांची होण्या घट्ट
सदैव हवी आधाराला
भक्कम विश्वासाची वीट

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

सगळं ठरलेलं असतं
पण कधी ठरवावं लागतं
विश्वासाची वीट सांभाळताना
जिवलगाना जपायचं असतं

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

*प्रत्येक घराला लावावी*
*एक विश्वासाची वीट*॥
*घरातल्या सदस्यांनी एकोप्याने*
*तिला जपावी नीट*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

विश्वासाची वीटच उभारते
नात्यांच्या इमारतीची प्रित
आयुष्याच्या वाटेवर गात सुटावे
जीवनाचे हे अविट संगित

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

स्वर सौख्याचे संसारी समाधानी
असता भक्कम विश्वासाची वीट
परसात रुजतो समृध्द वारसा
आपुलकीने जपता एकमेकांस नीट

*सौ.उर्मी ( हेमश्री)घरत पालघर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

विश्वासाची वीट देते
निस्वार्थ मैत्रीला आकार
मैत्रीमध्ये अडसर येतो
जेव्हा होतो त्यात व्यवहार

*दत्ता काजळे उस्मानाबाद*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

असता घराला विश्वासाची वीट
बनतो भक्कम मजबूत पाया
करता यत्न कुणी तोडण्याचा
परि जाई श्रम त्यांचे वाया

*प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर,जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*विश्वासाची वीट*

नाते असो कोणतेही
रचावी विश्वासाची वीट
आले कितीही संकटे
तेच बळ देते होण्या धीट

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📙💟📙➿➿➿➿
*चारोळी- विश्वासाची वीट*

गैरसमजाचं वादळ वारं क्षणात
विस्कळीत करतं सुखी संसाराला
अभेद्य विश्वासाची वीट असावी
राजाराणीच्या स्नेहाच्या घरकुलाला

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles