दुधनी येथे वार्षिक क्रीडा दिन व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन २५ रोजी
सिलवासा: केंद्रशासित प्रदेश दादरा, नगर हवेली येथील सेंट फ्रांसीस झेवीयर्स हायस्कूल, दुधनी येथील क्रीडांगणावर यंदाचा वार्षिक क्रीडा दिन व बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार दि, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २.४५ वा आयोजित करण्यात आला आहे. या भव्यदिव बक्षीस वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा शर्मा जिल्हा पंचायत दादरा नगर हवेली तसेच दुधनी गट ग्रामपंचायतचे सरपंच मा. महेशभाई खुळत उपस्थित राहणार असून, या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरीत केले जाणार असल्याचे दुधनी येथील मुख्याध्यापक फादर वॉल्टर डिसुझा व फादर सिलवेस्टर तसेच शिक्षक प्रशांत ठाकरे यांनी प्रसार माध्यमास सांगितले.