संतोष राऊत यांचा राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार व राजश्री राऊत यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

संतोष राऊत यांचा राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार व राजश्री राऊत यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

अर्जुनी मोरगाव: तालुका सौंदड जिल्हा गोंदिया येथील गीताई बहुद्देशीय विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक, संचालक श्री. संतोष राऊत यांना मराठीचे शिलेदार समूहा तर्फे यंदाचा जाहीर झालेला मराठी साहित्य क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय साहित्यगंध पुरस्कार सन्मानचिन्ह, मेडल, मानपत्र व साहित्यगंध अंक अशा स्वरुपात प्रदान करून गौरवण्यात आले.

तसेच पॅराडाईज इंग्लिश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री संतोष राऊत यांना त्यांच्या उत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी यंदाचा शिलेदार संस्थेतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिलेदार समुहाच्या परीक्षक, सहप्रशासिका, सहसंपादक प्राध्यापिका तारका रुखमोडे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, मेडल व साहित्यगंध पुस्तक देऊन त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. राजश्री राऊत या श्री.संतोष राऊत यांच्या सहचारिणी आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी विकासासाठी कार्यरत असतात.

याप्रसंगी शिलेदार समुहाचे सातत्यशील सदस्य कविवर्य केवलचंदजी शहारे हे आवर्जून उपस्थित होते. या निमित्ताने पुनश्च सर्वाची स्नेहभेट झाली. सन्मान स्विकारल्यानंतर राजश्री राऊत व संतोष राऊत यांनी शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, सचिव सौ.पल्लवी पाटील व सर्व पदाधिकारी तसेच प्रा.तारका रुखमोडे यांचे आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles