डॉ. अनिल पाटील यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार.

डॉ. अनिल पाटील यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रायगड: दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुबई येथे झालेल्या ‘ Rising of Global India: Aspiration, Possibilities and Challenges’ या विषयावर झालेल्या आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या जे.एस. एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांना “Eminent Researcher Award” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या परिषदेत एकूण ७० प्रतिनिधी सहभागी झाले होते. दुबई येथील राज ग्रुप ऑफ कंपनीज चे संचालक व दुबई चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष डॉ.मुस्ताफा सासा यांचे हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. अनिल पाटील यांनी या परिषदेत ” रायगड जिल्ह्यातील औषधी वनस्पती” या विषयावर शोधनिबंध सादर केला. जे.एस. एम. कॉलेजमधील वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका, डॉ. मिनल पाटील यांनी ” रायगड जिल्ह्यातील अळंबी” या विषयावर आपला शोध निबंध सादर केला.

समारोपाच्या कार्यक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. कावळे, प्राचार्य डॉ.जी.के. चेलियन हे उपस्थित होते. वजह फाऊंडेशन, नागपूर यांचे तर्फे देण्यात आलेला हा पुरस्कार डॉ. कावळे यांचे हस्ते डॉ. अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आला. डॉ. अनिल पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्षा, डॉ.साक्षी पाटील, इतर पदाधिकारी, प्राध्यापक आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles