गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेतील विजेत्यांच्या निवडक रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : ही वाट दूर जाते🌤️*
*🔹गुरूवार : २४ / ११ /२०२२*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*वाट दूर जाते…*

ही वाट दूर जाते
गतकाळी घेऊन मजला
आठवून देते आठवणी
नवपालवी फुटे मनाला…

*फुलवरे चंद्रकांत खेमाजी*
जि.हिंगोली
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

जन्म ,मरणाच्या वाटेवरी
कितीदा अश्रू नयनी दिसते
डाव मांडला कर्म सत्याचा
सत्यवली ही वाट दूर जाते…

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

वृक्ष ताटींनी सजलेली
ही वाट दूर जाते
घेण्या उत्तुंग भरारी
मजला सदैव खुणावते

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे,औरंगाबाद*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

दुतर्फा गर्द आमराई
लांबलचक धुसर
ही वाट दूर जाते
पोचते थेट वळणावर.

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

*ही वाट दूर जाते*

एकटीच नसे कोणी सोबती
ऊन सावलीचा खेळ पाहते
सुख दुःखाच्या सोशित नजरा
अवखळ कधी शांत, ही वाट दूर जाते

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*चित्र चारोळी-ही वाट दूर जाते*

दुतर्फा वृक्ष दाटी
शुभेच्छा देण्यासाठी
ही वाट दूर जाते
स्वप्न साकार करण्यासाठी

*सौ.शशी मदनकर, ब्रम्हपुरी*
*©सदस्या-मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*…

दुतर्फा झाडांतून चमकतो लोलक
ऊन कोवळे हळूच सांडते…
ओढ मनाला लावून अनामिक
साजरी ही वाट दूर जाते…

*अमृता खाकुर्डीकर पुणे.*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

झाडांच्या रांगा सांगती कहानी
कसे सोसयचे ऊन वारा पाणी
ही वाट दूर जाते सर्वांची लाडकी
विश्रांती घेई वाटसरू गाऊन गाणी

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

दुतर्फा गर्द झाडीतील
ही वाट दूर जाते….
स्वप्नाच्या दुनियेतील
एक नवे स्वप्न दाखवते..!

*श्री.बाळासाहेब रोहोकले*
मांडवे खुर्द,अहमदनगर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

ही वाट दूर जाते
गात तराणे प्रीतीचे
आनंदाने राहू एकत्र
वृक्ष बहरेल प्रेमफुलांचे….

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

श्वास घेऊन उरात
रोज चालत राहतो ….
ही वाट दूर जाते कुठे
तिला पाहत राहतो…

*विजय शिर्के , छ संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते…*

अंधारावर मात करून
नवी तेजोमय पहाट उगवते..
आशेच्या किरणांच्या साथीने
यशाची ही वाट दूर जाते…

*सौ पल्लवी कोंडेकर,पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते..*

तुझ्यासोबत वाटेने चालताना
माहित आहे, ही वाट दूर जाते
कायम तू सोबत आहेस म्हणून
अवघड वाटेचे अंतरही कमी होते…

*सौ.प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव – रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*चित्रचारोळी-ही वाट दूर जाते*

वृक्षवल्ली साथ निभावीती
तीला ना एकाकी कधी वाटे
अंत ना तिच्या अस्तित्वाला
निरंतर ही वाट दूर जाते..!

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿💕🦚💕➿➿➿➿
*ही वाट दूर जाते*

वृक्षसाऊली दोहीकडे
लोभस तिरीप किरणांची
हि वाट दूर जाते
धरूनी कास स्वप्नांची

*कु.एस.पी.रामटेके*
सडक अर्जुनी गोंदिया
*©सदस्या -मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles