

“शब्द आभाराचे…. कृतज्ञतेचे; आशा कोवे गेडाम”
🌺सहजतेचे स्वरूप निराळे
अनुभवातून दिला शब्दांना आगाज
साध्याशा या लेखणीस माझ्या
विराजला सर्वोत्कृष्टचा सरताज…
बुधवारीय चित्र चारोळी स्पर्धेमध्ये माझ्या चारोळीला सर्वोत्कृष्ट चा सन्मान देऊन गौरविल्याबद्दल, आम्हा नवागतांना अभिव्यक्तीचे विचारपीठ उपलब्ध करून देणारे मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुलदादा पाटील सर आपले मन:पूर्वक आभार🙏🙏🙏🙏
आज, आपल्या भारताची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढतेय जागतिक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण न आणल्यास 2024 अखेरपर्यंत आपला देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल.सातत्याने होत असलेली लोकसंख्यावाढ ही बाब आपल्यासाठी योग्य नाहीच. या प्रचंड लोकसंख्येच्या विस्फोटामध्ये माणसाने निसर्गाला ओरबाडून टाकलं, जंगलं तोडली गेली व ठिकठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली… राहत आहेत. मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत. आम्ही रोज ज्या रस्त्याने शाळेत जातो तिथे एक वर्षाआधी चांगली शेती केली जायची आज तिथे घरांसाठी प्लॉटिंग सुरू झालेली आहे. स्वेअर मीटर प्रमाणे जागा विकत घेतल्या जातात व निवारा उभारला जातो. आपल्या लहानपणात खेळामध्ये जो मोकळेपणा होता तो आता उरलेला नाही. आज शहरातील तसेच काही प्रमाणात खेड्यातील मुलांनासुद्धा त्यांच्या प्रत्येक मुक्त हालचालींमध्ये चौकट आलेली आहे. साचेबद्धपणा आलेला आहे. “ये…इथे नका खेळू…लांब जा…तिकडे जाऊ नका…” आदी नियमांमुळे मुलांच्या स्वतंत्र शिकण्याच्या गतीवर अंकुश लादला जातो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणातील बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक तथा शारीरिक विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. मनात नियमांची दर्पोर्ती ठेवून मुलं क्रिकेट खेळतात व अनवधानाने एखाद्या घराच्या खिडकीची काच फुटते तेव्हा मुलांना अपराध्यासारखं वाटते.
आदरणीय राहुल सर नेहमीच नाविन्यपूर्ण विषय देऊन लेखणीला विचारोन्मुख करायला लावतात. दिलेले विषय साधे-सोपे वाटत असले तरी गहनता अफाट असते. कालचा चित्रचारोळीचा विषयही असाच आजच्या सामाजिक वास्तविकतेला धरून असलेला… *चुकून झाली खोडी* चित्रचारोळी साकारताना मुलाच्या मनातील चुकीची स्पष्टोक्ती शब्दांत साकारण्याचा प्रयत्न केला.
व चारोळीला सर्वोत्कृष्टचा मुकूट लाभला.
शिलेदार समूह म्हणजे शब्द यात्रींची साहित्य पंढरी. इथे रोज नाविन्यपूर्ण शब्दांचा मेळा भरतो. इथे शब्दांचे भाव विलसतात… कल्पनेच्या कक्षा रुंदावतात… लेखणी विकसते… सृजनाचा उत्कर्ष होतो…विचार समृद्ध होतात…
अनुभवांतून स्फुरलेल्या विचारांना मौलिक शब्दाचा लौकिकार्थ उलगडणा-या… सर्जक विचारांचे मूलतत्त्व टिपणा-या… प्रेरक कर्तुत्वशालिनी… ज्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी लेखनाला दिशा मिळते अशा आदरणीय वैशाली ताई, सवूताई, स्वाती ताई, तारकाकाई, सुधाताई, संग्राम सर, हंसराज सर व सर्व मान्यवर प्रशासक, सह प्रकाशक, संकलक आपले हृदयस्थ आभार… 🙏🙏🙏तसेच नित्य शुभेच्छारूपी स्नेहांकीत सुगंध उधळणारे समुहातील सर्व साहित्य पंढरीचे वारकरी… शब्दयात्री ताई दादांचे मन:पूर्वक आभार🙏🙏🙏
➿➿➿➿💐🦚💐➿➿➿➿
सौ.आशा कोवे-गेडाम
वणी जि. यवतमाळ
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
➿➿➿➿🦚💐🦚➿➿➿