जिजाऊ ब्रिगेड सिलवासाची कार्यकारणी बैठक संपन्न

जिजाऊ ब्रिगेड सिलवासाची कार्यकारणी बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सिलवासा: दादरा नगर हवेली, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सविता पाटील ठाकरे यांच्या निवासस्थानी आज दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रविवार रोजी संध्याकाळी ४.०० वा जिजाऊ ब्रिगेड कार्यकारणी तसेच सभासदांची बैठक प्रदेशाध्यक्ष शिवमती सविता पाटील ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सिलवासा येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पुढील मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली.

1) नववर्ष व आगामी जिजाऊ जयंतीचे नियोजन करण्यात आले.

2)जिजाऊ ब्रिगेड कार्यकारणीतील बहुतेक पदाधिकारी दि.12 जानेवारीला सिंदखेड राजा या ठिकाणी जाण्यास उत्सुक असल्याकारणाने ते सिलवासा येथे उपस्थित राहू शकणार नाहीत,

3) पुढील महिन्यात डिसेंबर अखेरीस नाताळची सुट्टी असल्याने 23 किंवा 24 डिसेंबर रोजी जिजाऊ जन्मोत्सव सिलवासा येथे साजरा करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

4) जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमातच दादरा नगर हवेली येथील दहावी व बारावीच्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचे निश्चित केले.

5) गुणवंत विद्यार्थांना जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्याचा मानस असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवमती सविता पाटील ठाकरे यांच्यासह बैठकीत पुढील पदाधिकारी उपस्थित होते. महासचिव – शिवमती विद्या कणसे, सहसचिव – शिवमती प्रांजली पाटील, कोषाध्यक्ष शिवमती मेघा वाघ.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles