
आदर्श शिक्षक गणेश पाटील यांना सहित्यगंध पुरस्कार प्रदान
नंदूरबार: येथील श्री गणेश नरोत्तम पाटील उपशिक्षक वल्लभ विद्यामंदिर पाडळदा मु.पो. म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्था नागपूर मार्फत राज्यस्तरीय साहीत्यगंध पुरस्कार मानपत्र , सन्मान चिन्ह ,ट्राफी , दिवाळी विशेषांक देऊन सन्मानित करणेत आले .साहित्यगंध दिपोत्सव दिवाळी विशेषांकात लेख *माझी शाळा माझे उपक्रम* व कविता *उभारू गुढी भाषेची* प्रकाशित करणेत आली आहे ., मराठीचे शिलेदार बहुऊद्देशीय संस्था नागपूर द्वारे आयोजित लातूर येथे राज्यस्तरीय काव्य सम्मेलन , दिवाळी विशेषांक प्रकाशन आणि राज्यस्तरीय साहीत्यगंध पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला .
मानपत्र , ट्राफी , सन्मान चिन्ह , दिपोत्सव दिवाळी विशेषांक असे पुरस्कार स्वरूप होते. श्री गणेश पाटील यांनी आजपावेतो विविध लेख , कविता , शैक्षणिक भाषिक साहीत्यिक उपक्रम यात सक्रीय सहभाग घेतला आहे.
*कविता* माय मराठी , महाराष्ट्र माझा , माझी शाळा , मराठीची श्रीमंती, जीवन , पाऊस मनातला , स्नेहवलये ,रानफुल , गुढी ऊभारू भाषेची , गुरूकिल्ली,
*विविध विषयांवर चारोळी लेखन*
*लेख* मी आणि माझे विद्यार्थी ,
प्रिय विद्यार्थी मित्रास..,
मराठीची जन्मकथा व उत्पत्ती,
माझी शाळा माझे उपक्रम,
हॄदयाशी होणारा संवाद म्हणजे भाषा … आदी लेखनकार्य केले आहे. मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्था ही राज्य व राष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेचे सक्षमिकरण आणि संवर्धनाचे विविध कार्यक्रम , उपक्रमांचे आयोजन करते तसेच दैनंदिन विविध शैक्षणिक उपक्रम राबविते.