
माझ्या मनातले शब्द…!; वसुधा नाईक
मा.राहूल सर,पल्लवी ताई, सवूताई, वैशूताई,स्वाती ताई,सुधा ताई,संग्राम सर,अशोक सर ,समस्त शिलेदार परिवार आपणा सर्वांना मानाचा मुजरा….
खर सांगू मला सकाळी साडेसहाला घर सोडावे लागते. त्यामुळे सकाळी समूह बघायला साडे नऊ होतात.कारण साडेनऊला मधली सुट्टी होते.
मला डबा खायला पंधरा मिनिटे.चहाला पाच मिनिटे.व उरलेल्या दहा मिनिटात पट पट मेसेज चेक करायचे.व दहाला पटकन नेट परत करायचे.
यात समजले तर समजते की आपल्या रचनेला प्रथम दहा किंवा पंधरा मधे नं. आला आहे.
मग धावपळ होते ती फोटो द्यायची. कधी कधी जमतही नाही .मग फोटोविना प्रमाणपत्र तयार होते.वाईट वाटते.
तरी मेजर अशोक सर मला बर्याचदा आठवण करून देतात.पण नेट बंद असते त्यामुळे तेही समजत नाही…
तुम्ही म्हणाल हे काय वसुताईने …अहो हे वसुचे मन बोलतेय..तळमळ बोलतीये..कारण
हल्ली चार वेळा माझी निवड हायकू रचना ,चित्रचारोळी, कविता रचना माझी पहिल्या दहा किंवा पंधरा मधे निवड झाली पण मनोगत लिहायला वेळच मिळाला नाही.पण आज मनोगत लिहायचेच हे मनाशी ठरवले होते.व वसूने मनाशी ठरवले म्हणजे ते पूर्ण करतेच.
आजही मी सकाळी आठ वाजता ऊरळी कांचनला मित्राच्या मुलाचे लग्न होते तिकडे गेले होते.साडेसहाला परत आले. चहापाणी केले.पोळी ,भाजी करून वैभवला जेवायला दिले व आता मी लिहायला बसले.
खूप दमले पण लिहायचेच हा चंग मनाशी बांधल्याने मी लिहू लागले.
बररर ..आता जरा कवितेबद्दल लिहिते..काल विषय होता संविधानावर आधारित..मन गप्प बसू देईना.लेखन चालू केले. विचार सुरू झाले.लेखणीने शब्द उमटवले..आज चक्क प्रथम पंधरा मधे स्थान मिळाले..सकाळी हे पाहून खूप खूश झाले.
परवा चित्रचारोळी मधे ,त्या आधी हायकू रचनेमधे मला विजेत्यांमधे स्थान मिळाले…
मी या आठवड्यात खूप खूप खूपप आनंदी झालेय…
मन पाखरू झाले
समूहात फिरूनी आले
समूहातच सदा रमले
वसुधा नाईक,पुणे
सदस्या मराठीचे शिलेदार समूह