उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अख्खा बुलडाणा रस्त्यावर उतरला होता; संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अख्खा बुलडाणा रस्त्यावर उतरला होता; संजय राऊत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: गट अध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिमिक्री करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी थेट नाव न घेता उत्तर दिलं आहे.

ज्यांनी आमच्यावर टीका केली, करताहेत, त्यांनी बुलडाण्याची सभा बघायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला हवे होते. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अख्खा बुलडाणा रस्त्यावर उतरला होता हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जी मेहनत आणि कष्ट घेतले, ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखवावेत, असेही राऊत म्हणाले. राजकारण ही मिमिक्री नाही. आम्हाला ओरिजिनल मिमिक्री बघायची असेल तर ती आम्ही जॉनी लिव्हरची बघू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, रविवारी गट अध्यक्षांच्या मेळाव्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. या टीकेला आज, सोमवारी संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राजकारण ही मिमिक्री नाही. मिमिक्री बघायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची बघू, ती पण ओरिजिनल. आम्हाला राजू श्रीवास्तवही आवडायचा. इतरही अनेक आहेत. आम्ही खरी मिमिक्री बघू. आवाज काढणे, अमूक-तमूक करणे खूप झाले. त्याही पलीकडे तुम्ही मॅच्युअर्ड झाला आहात. थोडं पलीकडे पाहा. महाराष्ट्र बघावा,’ असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंवर टीका करून तुमचे राजकारण किती काळ चालणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मी एका पक्षाचं नाव घेत नाही. त्यापेक्षा काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. जशी आम्ही करतो आहोत. आमच्या पक्षावर इतकी संकटे आली आहेत. तरीही आम्ही कामे करतोय. लढतोय, असंही राऊत म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles