
विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच आमचे ध्येय; ओमप्रकाशसिंह पवार
_न्यू मून शाळेत पालक शिक्षक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद_
प्रा. तारखा रूखमोडे, प्रतिनिधी
अर्जुनी/ मोर: प्रथम सत्र परीक्षेचा निकाल व पुढील कार्य नियोजन आढावा या अनुषंगाने दिनांक 25/ 11/2022 ला न्यू मून इंग्लिश मिडीयम शाळेत पालक शिक्षक सभा घेण्यात आली. या सभेला संस्थेचे सचिव श्री. ओमप्रकाशसिंह पवार प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते. तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. सचिन मेश्राम, उपाध्यक्षा त्रिशीला बडोले, सचिव लिना चचाणे, सहसचिव मेघा धनविजय व विशेष अतिथी म्हणून पर्यवेक्षक प्रा. राकेश उंदिरवाडे व पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य व पालक उपस्थित होते.
या सभेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच स्नेहसंमेलन नियोजन व एक दिवशीय सहलीचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. संस्था सचिव श्री.पवार, प्राचार्य मेश्राम, प्रा. उंदिरवाडे, प्रा. तारका रुखमोडे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले. संस्था सचिव श्री पवार यांनी विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच आमचे भविष्यात ध्येय असेल, त्यासाठी आगामी काळातही आम्ही सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ असे भाषणात नमूद केले.
सभेचे सूत्रसंचालन कुंजना बडवाईक, प्रास्ताविक त्रिवेणी थेर व आभार प्रतीक्षा राऊत यांनी मानले. सभेअंती विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला. सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यासाठी प्रा. तारका रुखमोडे,हिना लांजेवार,श्री बांडे प्रा. उंदीरवाडे यांनी परिश्रम घेतले व सभा शांततेत पार पडली.