
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
◼ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार.
◼ दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार. ३ डिसेंबरपासून विभाग कार्यरत होणार.
◼ अधिसंख्य पदांवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांना काही सेवाविषयक लाभ देणार. अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करणार.
◼ सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर. राज्य शासनाची ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.
◼ प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्यांना याचा फायदा होईल.
◼ गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. राज्यातील २,३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देणार.
◼ अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. ४,३१७ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार.
◼ नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या १६९.१४ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ३,६५९ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार.
◼ शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८ या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीच्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणार.
◼ महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे गठन.
◼ बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्त्वावर मान्यता.
#मंत्रिमंडळ_निर्णय
#महाराष्ट्र_सरकार