
➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*✍️परीक्षकाच्या लेखणीतून…*
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*☄️शीतलहरी असतातच मुळी लहरी*☄️
मुख्य कार्यकारी संपादक सविता पाटील ठाकरे
*ना झुळुक,शीतलहर आली*
*वाट दुभंगून निघून गेली*
*नातीगोती संपवून सारी*
*सरणावरती घेऊन गेली..*
*🙏नुकतेच लग्न झालेले….*
*दिल्लीच्या त्या झोंबणाऱ्या थंडीत सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या गीताला आज संध्याकाळच्या थंडी पूर्वीच हुडहुडी भरली होती…*
*त्याचं ते रानटी* *वागणं*..*गुरासारखं मारणं सारं नको नको वाटत होतं गेल्या महिन्याभरापासून आतेभावाच्या साध्या विचारपूस करणाऱ्या एक फोन नंतर संशयाचे भूत त्याच्या अंगात जे घुसलं होतं ते निघता निघत नव्हतं…*
*विचाराची तंद्री भंग पावली ती दरवाज्याच्या बेलने.. तो आज तर दारू पिऊन तर्र झालेला..* *घरात आल्याबरोबर त्याने सुरू केले.. किती वेळ बोललीस आज? तिच्या उत्तराची वाट पाहण्याची तसदीही न घेता केसांना धरून लाथा बुक्क्यांनी मार मार मारलं तिला….ती रडत बसली बिचारी अश्रू सुकेपर्यंत… कसा आणि किती ना हा मानवाचा लहरीपणा…सुखी संसाराची स्वप्न पाहणारी गीता अश्रूंचा स्वतःवर अभिषेक करता करता इतकी कोरडी झाली की स्वतःला कधी दोरखंडाला लटकवून तिने जीवन संपवलं तिलाही कळलं नाही.*
*🌈तसं पाहता.. सदन घरातल्या गीताचे वडील सीमेवर रक्षण करणारे शूर सैनिक होते… सीमेवर शीतलहरींचा सामना करताना अगदी डोळ्याचं पातं ही कधी लवत नव्हतं त्यांचं….उणे तापमानात मातृभूमीला आईसारखे जपत होते ते… अशा देशभक्त सैनिकाच्या नशिबात काय लिहिलं होतं….*
*एकुलती एक मुलगी परमेश्वराला प्रिय झाली..*
*🔹ज्या शीतलहरींनी त्यांना साधा स्पर्श सुद्धा कधी केला नव्हता त्या लहरींनी यावेळी मात्र बरोबर वेळ साधली…..* *मुलीच्या मृत्यूची बातमी त्यांना कळली आणि शीतलहरीत स्वतःला सामावून घेत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा जीव गेला..*
*या शीतलहरी असतात मुळी लहरीच*…
*🌈शेजारचे सदाबापू हिवाळ्यात लोड शेडिंग मुळे कडाक्याच्या थंडीत रात्री गव्हाला पाणी भरायला जायचे… त्यांना थंडी नसेल का वाजत? गेली अनेक वर्ष माझा प्रश्न अनुत्तरीतच आहे..त्यांच्यासाठी शीतलहरी काय आणि उष्णता काय…*
*🦚घामानं दिवसभर थबथबायचं ….अंग मोडे पर्यंत वाकायचं… पोटापुरतं मिळवायचं*.
*काय फरक पडतो त्यांचा आपल्याला ,आपण तर निर्ढावलेले शहरी बाबू.. म्हाताऱ्या माणसाच्या धोतराची टिंगल करण्यात धन्यता मानतो, आणि ते बिचारे चिंता करतात आपल्या पोषणाची …*
*तरी बरं त्या शीतलहरी हल्ली नावातील शब्दाप्रमाणे लहरी वागायला लागल्या*.*दिवसाला तीन-तीन ऋतू दाखवतात पण आपण कधी सुधरू?माहित नाही.*
*मला ना ती व्यक्ती मनापासून* *आवडली कडाक्याच्या थंडीत गाडीत पांघरायचे शाल,चादर* *भरायचे आणि निघायचं*….*रस्त्यावर थंडीत कुडकुडत असणाऱ्यांना ते चादर,शाल वाटायचे..प्रसिद्धीची हावच नसते मुळी तेव्हा..*
*सोबत ना कॅमेरा हवा न* *पत्रकार त्याच्या आभाराला शीतलहरी आणि डोळ्यात कृतज्ञतेचे भाव असलेले अंतःकरण…*
*🐾पाहिलंत ना किती चपखळ अवखळ आहेत त्या शीतलहरी कधी आनंद, कधी दुःख, कधी दाह, कधी वेदना,कधी हसू तर कधी अश्रू त्यांना बांधणे सोपं नाही हे जेव्हा राहुल सरांना जाणवलं तेव्हा आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहात शीतलहरी हा विषय देऊन काव्यरसिकांना लिहण्यास प्रवृत्त केले.*
*✍️अनेकांनी आपापल्या परीने रचना लिहिल्यात सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन.*
*आज एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शीतलहरी विषय थंडी, स्वेटर, ऋतुचक्र, शेकोटी धुके एवढ्यातच आपण मर्यादित ठेवला.*
*🙏मला मनापासून वाटते विषयाचा गर्भितार्थ समजून घेणे हे कविता लिहिण्यापूर्वी खूप महत्त्वाचे आहे. शब्द भले साधेही असो,पण त्यातला भावार्थ मोठा असावा.*
*कवींने कधीही स्वतःभोवती मर्यादेचं कुंपण न घालता मुक्त आकाशात विहंगणाऱ्या पक्षाप्रमाणे आपल्या विचारांना सुद्धा मुक्त ठेवले पाहिजे.*
➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री/समीक्षक/मुख्य सहसंपादक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖✍️📕✍️➖➖➖➖