
➿➿➿➿🦚🙏🦚➿➿➿➿
*🚩 आम्ही साहित्यवारीचे प्रवासी 🚩*
➿➿➿➿🦚🙏🦚➿➿➿➿
*🗣️ जेवण आटोपल्यावर दुपार सत्राची म्हणजेच कविसंमेलनाची सुरवात झाली… कविसंमेलनासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले कोंपलवार दादांनी कवी हा ईमानी असतो तो कधीच बेईमानी नसतो…. आणि कुठलाही कवी तो इमान असते त्याचे इमान कधीच गहाण नसते…तोच खरा कवी असतो… त्यासाठी अधिकाधिक वाचनावर भर द्यायला पाहिजे…जो माणूस पुस्तक वाचतो त्याचे मस्तक प्रकष्ट असते…ज्याचे मस्तच प्रकष्ट असते ते कधीच कुणापुढे झुकत नसते… अशाप्रकारे मार्गदर्शनातून चारोळ्याची बरसात करत सारस्वतांना बोधामृत पाजिले. कविसंमेलनाध्यक्षा बीडची शर्मिला देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कवी म्हणजे कोण असतो ? तर तो शानदार,जानदार, ईमानदार असून त्याच्या मुखातून जीवन झरा वाहत असतो. अनेक अलंकाराच्याही पलीकडे जावून भाषेला सजवून आणणारा तो एकमेव कवी असतो. मन:चक्षुने जगातील आणि मनातील भाव ओळखणारा मनकवडा तो कवीच असतो. एवढी ताकद ही कवीच्या लिखाणात असते. संवेदना आणि वेदना यातून काव्यनिर्मिती होत असते म्हणून शब्द हे तोलून मोलून वापरावे. त्यासाठी शब्दांची काळजी घेणे आवश्यक असते..आपल्या लाघवी वाणीने कवी आणि काव्यनिर्मीतीची विस्तृतपणे माहिती देऊन रसिक श्रोत्यांच्या मनावर कवी प्रतिबिंबाची छाप बिंबवली…इतक्या कमी वयात उत्तुंग झेप खरंच प्रशंसनीय आणि स्तुत्य…*
*🦚यानंतर सारस्वतांच्या साहित्याची मांदियाळीला सुरवात झाली. सर्व कवींनी ‘एक से बढकर एक’ अशा अनेक कविता सादर केल्या. रसिक श्रोते हे मंत्रमुग्ध झाले आणि सभागृहात कवीच्या मधूर वाणीचा नाद हा गुंजू लागला. सुत्रसंचालनाचा भार संग्राम दादा, आणि प्रशांत दादांनी जबरदस्त केला तर आभार प्रदर्शन आमच्या लाडक्या वैशालीताई यांनी मानले… टाळ्यांच्या गजरात हा नयनरम्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला… साहित्याचा ज्ञानोत्सवाचा सोहळा याची देही याची डोळा पाहिला…*
*🫂अशा प्रकारे सोहळा डोळ्यात साठवून एकमेकांशी गळाभेट घेऊन जड अंतःकरणाने पावले परतीच्या प्रवासाला निघाली.*
*🌀कार्यक्रमाच्या सांगतांनंतर संग्राम दादाचा आग्रहाचा आमंत्रण….बहिणीला शक्य नाकारण…वैशालीताई, रंजनाताई, पुष्पाताई, तारकाताई, मी ,कृतिका तसेच उंदीरवाडे दादा, त्यांची सहचारणी, शिर्के दादा, क्षीरसागरदादा सर्व मिळूनी आम्ही दादांचा घर गाठलं… दादा आणि कांचन वहिनीच्या आदरातिथ्याने मी भारावून गेली. दादा सोबत भेट ही दररोज होत असते; परंतु वहिनीसाहेबासोबत आपली भेट ही पहिल्यांदाच होती तरी क्षणात आपलंस करून टाकले होते. अशी जादू वहिनीच्या स्वभावात होती. निर्मळ, सोज्वळ,सालस स्वभाव मनाला खुपच भावला. दादा वहिनीप्रमाणेच मुले भाच्चा,भाची पण तेवढीच मायाळू…वहिनीचा आदरसत्कार पाहून जणू मी माहेरी आली असेच वाटत होते. दादा वहिनीने दिलेली साडीचोळीची अनमोल भेट तसेच तहानीचे तहान लाडू भुकीचे भुक लाडूचे गाठोडे आम्हा सर्व बहिणींना बांधून दिलं हे पाहून डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहू लागल्या. किती बरं हा मायेचा जिव्हाळा. हि अविस्मरणीय अनमोल भेट श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हदयात राहील. हे ऋण कधीही फेडू न शकणारे… नशिबवान आहे मी कि मला तुम्हादोघांचा सहवास लाभला आणि असाच पुढे लाभत राहो….एवढीच मनीची इच्छा ..तुम्हा सर्वांचे जीवन सुख, समृद्धी, आनंदमय , भरभराटीचे तसेच यशाचे उंच शिखर गाठत राहो…हिच तथागताचरणी मनोकामना ….🙏🙏🙏*
*🚗 संग्राम दादा घरचा पाहुणचार घेऊन आर.आर.लॉजकडे निघालो. सर्व फ्रेश होऊन जेवनासाठी भुरकेदादा,तारकाताई,रंजनाताई, सविताताई आणि मी बाहेर गेलो. जेवण यायला वेळ असल्याने उद्याच्या नियोजनाचा बेत कसा करता येईल यावर चर्चा विचारविनिमय करत होतो.कारण आमची परतीची ट्रेन ही ४ तारखीची वेळ ८:२० मिनिटांनीची होती..दिवसभर काय करणार त्यापेक्षा आपल्याला जवळपासचे स्थळ पाहायचे ठरले. आमची ती लातूरची शेवटची रात्र होती. वैशालीताई , पुष्पाताई पण तेथेच होत्या जेवण आटोपल्यानंतर आम्ही सर्व महिलांनी हितगुज करत गाण्याचा बोलावर थिरकतांना जणू आम्ही बालपणाच्या विश्वात इतके गुंग झालो कधी एक वाजला कधी कळलाच नाही. लातूरची आमची शेवटची रात्र होती. वैशालीताईचा सहवासात खुप काही शिकायचं होतं आणि अख्खी रात्र जागून काढली असती परंतु पहाटेलाच वैशालीताई तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनाला जाणार आणि आम्हाला पण लातूरच्या पवित्र स्थळाना भेट घ्यायची होती म्हणून आम्ही गप्पागोष्टीना तेथेच विराम देत घालवलेल्या क्षणाच्या अनमोल आठवणी हदयाशी घेऊन आम्ही सर्वजण झोपी गेलो.*
क्रमशः
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*✍🏻सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿