“असाच एका महात्म्याचा शोध”; संग्राम कुमठेकर

“असाच एका महात्म्याचा शोध”; संग्राम कुमठेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दिनांक २५ डिसेंबर २०२० ची ती सायंकाळ. पश्मिमेला आकाश लालीमा चढल्यासारखे दिसत होते. असंख्य पाखरं परतीचा प्रवास करून आपलं घरटं जवळ करण्याच्या तयारीत दिसत होती. दिवसभर टवटवीत असणारी वृक्षपर्णही निद्राराणीच्या कुशीत जाण्यासाठी आसुसली आहेत की काय असंच वाटत होतं. रस्त्यावर गाड्यांची, माणसांची वर्दळ वाढली होती..सर्वांना घरी जाण्याची आस लागल्याचे जाणवत होते. आम्ही सर्वजण कार्यक्रमाची तयारी करून मुक्कामाच्या नियोजित स्थळी पोहचलो.

आदराने ऐकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात रात्रीचे दहा कधी वाजले कुणाच्या लक्षातही आले नाही. कार्यक्रमाची रूपरेषा करण्यात सर्वजण व्यस्त होते. मी काही करू का ? असे विचारताच “अहो ,तुम्ही उद्याचे कवी संमेलनाध्यक्ष आहात, आराम करा. आम्ही सर्व करतोत” मला ओशाळल्यासारखेच वाटले. थोडंस फिरावं म्हणून बाहेरच्या व्हरांड्यात आलो तर वातावरण अगदी पावसाळ्यातल्या सारखं झालं होतं. क्षणात कधीही पावसाला सुरूवात होईल असे वातावरण निर्माण झाले होते. मी तात्काळ रूममध्ये आलो नि सर्वांना याची कल्पना दिली. त्यामुळे लगेच अरेच्चा…वातावरण खूपच बिघडलंय…मी जातो …तुम्ही सर्वजण निवांत आराम करा…सकाळी लवकर उठा नि तयार व्हा…असं म्हणून ते ताडताड निघाले नि आम्ही सर्वांनी आपापल्या रूमचे दरवाजे लावून गप्पा मारूच लागलो नि जोरदार पावसाला सुरूवात झाली. खूपच मुसळधार पाऊस होता. तो सतत रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत पडतच होता.

लांबचा प्रवास करून आल्यामुळे सर्वजण थकलेले होते. लवकरच सर्वांना झोप लागली होती.मला नवीन स्थळी लगेच तेवढी गाढ झोप लागत नाही. रात्रीच्या तीन वाजता मी पावसाचा अंदाज घेण्यासाठी म्हणून दरवाजा उघडून बाहेर आलो व सरळ गेटजवळ येऊन पाहतोय तर काय तिथं कुणीतरी थांबलेलं आहे असं मला वाटलं…क्षणभर भीतीही वाटली पण हिंमत करून आवाज दिला ” अहो कोण आहे बाहेर ” अन् बाहेरनं आवाज आला ” अहो दादा मी आहे. मोठ्यानं बोलू नका.झोपमोड होईल सर्वांची…पण मी गप्प बसेन का ? मी म्हटलं “अहो, तुम्ही इतक्या लवकर कशाला आलात बरं ? ” तेव्हा ते म्हणाले,” अहो लवकर कशाला येऊ…मी गेलोच नाही तर येऊ कशाला ? ” अंधारात मला बसलेला आश्चर्याचा धक्का …माझ्या मनात मातलेलं प्रश्नाचं काहूर…कदाचित अंधारात लक्षात आलं नसेल पण मी बेचैन झालो नि म्हणालो,”तुम्ही का गेला नाहीत ? आराम केला नाहीतर मग उद्याच्या कार्यक्रमाचं कसं होईल ? गेटजवळ का थांबलात ? आत का आला नाहीत ? माझी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली नि त्यांनी मला शांत व्हा…हळू बोला…अहो मी चालत रोडवर गेलो नि जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे मला एकही अॕटो वा ओला गाडी मिळाली नाही मग मी जाणार कसा ? मग मी म्हणालो,”मग तुम्ही परत इथं रूममध्ये यायचं…बाहेर का थांबलात ?” तेव्हा ते म्हणाले,”माझ्या अंगावरचे सर्व कपडे भिजलेले होते नि तुम्हीही लांबचा प्रवास करून आलेले.

तुमची झोपमोड झाली असती. आमचा हा संवाद दबक्या आवाजात चालू असताना पाऊस कधी थांबला हे आमच्या लक्षातही आलं नाही. घड्याळात साडेचार झाल्याचेही समजले नाही नि एकदम तेच मला म्हणाले,” पाऊस थांबलाय आता मी जातो…आता आटो मिळेल मला…तयार होऊन सात वाजता येतो…तुम्ही सर्वांना वेळेवर उठवा…कार्यक्रम वेळेवर सुरू झाला पाहिजे…आणि लक्षात ठेवा मी इथं थांबलेलं कुणालाही सांगू नका…मला असा त्रास सहन करायची सवय आहे. असं म्हणून ते ओल्या कपड्यातच ताडताड चिखल तुडवत निघूनही गेले.

माझं डोकं विचार करून सुन्न झालं होतं. दुसऱ्यांची झोपमोड होऊ नये म्हणून स्वतः भिजलेल्या कपड्यांत रात्री अकरा ते साडेचार पर्यत गेटजवळ थांबून राहणे म्हणजे काय ? आजच्या या जगात दुसऱ्यांच्या सुख-दुःखाचा कोण विचार करतोय. विचाराचं वादळ काही शांत होत नव्हतं. कवीसंमेलनाध्यक्ष म्हणून भाषणासाठी काढलेल्या मुद्द्यावरून दोनवेळा नजर मारली. भाषणात अद्वितीय कार्याबद्दल खूप बोललो नि तरीही हा प्रसंग सांगण्याची इच्छा दाबून टाकावी लागली होती. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हे सर्व कोणत्या कार्यक्रमाच्या वेळी घडले व ती व्यक्ती कोण..तर तो कार्यक्रम होता “एक माध्यान्ह प्रेमाची” राज्यस्तरीय कवीसंमेलन , डाॕ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह,उरवेला काॕलनी,नागपूर येथील. आता नक्कीच लक्षात आलं असेल अनेकांच्या ती व्यक्ती म्हणजे देवांश राहुलदादा…रात्रभर जागरण होऊनही सकाळी काही घडलंच नाही अशा रितीने ते कार्यक्रम पूर्ण पार पडूस्तोवर दादा वावरत होते.

माझ्या गुरूमाऊली डॉ.पद्माताई जाधव/वाखुरे या प्रमुख प्रकाशन व पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या. वैशालीताई व सवूताईनं अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं होतं. दिवसभर कार्यक्रमातली धावपळ करूनही रात्री ९.३० वाजता शेवटचा मीच परतीच्या प्रवासाला निघणारा. माझ्यासोबत कवयित्री अर्चना पौळ मॕडम पहिल्यांदा आलेल्या, आम्हाला गाडीत बसवूनच राहुलदादा घरी गेले. त्यांच्या या समर्पणापुढे आपलं समूहासाठी वा माय मराठीसाठी दिलेलं योगदान अगदी नगण्य आहे.

शिलेदारांचा हा सारथी
आहे खराच हो पारखी
शिलेदार रथी – महारथी
किर्ती वर्णू कशी आणखी

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेत माझ्या… “त्या” भुलथापा….या कवितेला सर्वोत्कृष्ट स्थान देऊन सन्मानित केले याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! ! ! ! ‘माय मराठी’च्या सक्षमीकरणाचा ध्यास मनी बाळगून माय मराठीच्या सेवेत सतत तत्पर असणाऱ्या देवांश राहुलदादांच्या या कार्यामध्ये साहित्यिक / कवी /लेखक म्हणून शक्य तो सर्वतोपरी सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो.२६ डिसेंबर २०२० चा हा कार्यक्रम कायमस्वरूपी आठवणीत राहिल असाच झाला.त्याच अनुभवातून लातूर येथे ३ नोव्हेंबरचा कार्यक्रम यशस्वीपणे घेण्याची ऊर्जा मिळाली असे म्हणणे अतिशयोक्ती वाटू नये. प्रत्येक कार्यक्रमात राहुलदादांचे सूक्ष्म नियोजन असते म्हणून लातूरचा हा कार्यक्रम यशस्वीपणे घेऊ शकलो. त्यासाठी मुख्य आयोजक म्हणून मी जरी असलो राहुलदादांचे मार्गदर्शनाशिवाय व काही आयोजकांच्या सहकार्याशिवाय घेणे शक्य झाले नसते. म्हणून सर्वाचे मनःपूर्वक आभार… यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून लातूरला आलात व दुसरं म्हणजे आपणांस हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐

महात्म्याचा लागला शोध
समर्पणातून घेताच रे बोध
विनाशकारी क्रोध तो असे
पुस्तकासोबत वाचक हसे

✍️ श्री.संग्राम कुमठेकर
मु.पो.कुमठा (बु.)
ता.अहमदपूर जि.लातूर
सहप्रशासक/परीक्षक/संकलक
©️मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles