
जि.प.शाळा रणकोळ पाटील पाडा येथे शैक्षणिक व सांस्कृतिक भवनाचे थाटात उद्घाटन
_जि.प.उपाध्यक्षपंकज कोरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन_
हणमंत हेड्डे, प्रतिनिधी पालघर
पालघर, डहाणू: जि. प. शाळा रणकोळ पाटीलपाडा येथे दि २२ डिसेंबर २०२२ रोजी जितेंद्र किर्तीलाल भन्साळी ट्रस्ट मुंबई व विकास भरती ट्रस्ट बोईसर यांच्या संयुक्त आर्थिक सहकार्याने साकार झालेल्या शैक्षणिक व सांस्कृतिक सभागृहाचा शालार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमास मा. पंकज कोरे (उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती जि. प.पालघर,चंदन सोलंकी (अध्यक्ष, विकास भरती ट्रस्ट बोईसर) , विवेक करवीर (उपाध्यक्ष, विकास भरती ट्रस्ट बोईसर), वसंत महाले (गट शिक्षणाधिकारी पं. स. डहाणू), कृष्णा गुरोडे (शिक्षण विस्तार अधिकारी डहाणू),वनिता करमोडा मॅडम (सरपंच, रणकोळ-ऐना ग्रामपंचायत), मूलचंद बोलाडा (उपसरपंच, रणकोळ-ऐना ग्रामपंचायत) तसेच दोन्ही ट्रस्टचे सर्व मान्यवर सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून, सरस्वतीचे पूजनाने झाली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी कर्णमधुर व सुरेल असे ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. शाळेचे पदवीधर शिक्षक तथा प्रभारी केंद्र प्रमुख मा.विठ्ठल ठाणगे सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख सर्व मान्यवारांसमोर मांडला. शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात अतिशय ओघवते व आत्मविश्वासपूर्वक आपले मनोगत व्यक्त केले. ज्याचे कौतुक मंचावरील सर्व मान्यवरांनी केले. मा. विस्तार अधिकारी गुरोडे सर व गटशिक्षणाधिकारी वसंत महाले साहेब यांनीही आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले. मा. विवेक करवीर साहेब यांनी त्यांच्या ट्रस्टच्या कार्याची व्याप्ती सभागृहासमोर मांडली व उत्तमोत्तम नागरिक शाळेच्या माध्यमातून आपल्या देशाला मिळणार असल्याचे मत व्यक्त केले.
मा. उपाध्यक्ष पंकज कोरे साहेबांनी मुलांचे विशेष कौतुक केले व आपल्याला ही आपले शालेय दिवस आठवले याचा आवर्जून उल्लेख केला. मागील 2-3 वर्षांपासून बंद असलेल्या क्रीडा स्पर्धा या वर्षी होतील असे त्यांनी आश्वस्त केले. शाळेचे व शिक्षकांचेही कौतुक त्यांनी आपल्या मनोगतातून केले. उत्कृष्ट असे पेटी वादन व ढोलकी वादन गंधकवाड सर व प्रवीण पाटील सर यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुवनेश्वर पागधरे सर तर आभार प्रदर्शन विठ्ठल ठाणगे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मदगे सर, कापसे सर, बोडके सर, चौधरी सर, कचरे सर व शेटे सर, रेपाळ सर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता गंधकवाड सरांनी बासरी वर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या वादनाने झाली.