पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन

पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अकाली निधनाने शहरात हळहळ_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: शहराच्या माजी महापौर आणि विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांचे
कर्करोगाशी झुंज देत अखेर गुरूवारी दुपारी निधन झाले. ( वय५७) त्यांचे पार्थिव आज सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत टिळकवाड्यातील निवासस्थानी अत्यंदर्शनासाठी ठेवून त्यानंतर नवी पेठ, वैकुंठ भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

लोकमान्य टिळकांचे पणतु शैलेश टिळक यांची पत्नी या नात्याने त्या टिळक घराण्याची स्नुषा झाल्या आणि लोकसेवेचा वारसा घेऊन राजकारणात आल्या. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, निगर्वी, पक्षीय भेदभाव विसरून, राजकारणाच्या पलीकडे जात शहराच्या विकासासाठी काम करणा-या उच्च शिक्षित अशा मुक्ताताई सामान्य लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याने त्यांच्या निधनाने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राजकारणात त्यांचा प्रवेश प्रथम सन २००२ मध्ये नगरसेवकाच्या रूपाने झाला. पुण्याची शनिवार पेठ-रमणबाग परिसराच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक म्हणून त्या सलग तीन वेळा निवडून आल्या. सन २०१७ मध्ये पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर त्या महापौरपदी विराजमान झाल्या. त्या काळात त्यांनी अनेक कामे धडाडीने केली.

त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या कसबा पेठ मतदार संघातून आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्या. परंतु दुर्दैवाने थोड्याच दिवसात त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने गाठले. अशा गंभीर स्थितीत सुध्दा त्यांनी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीस सभागृहात उपस्थित राहून आपले बहुमोल मतदानाचे कर्तव्य निभावले. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगा – कुणाल, मुलगी- चैत्राली, सून जावई असा मोठा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles