पुण्यात विश्व गौ-परिषदचे २५ डिसेंबर पर्यंत आयोजन

पुण्यात विश्व गौ-परिषदचे २५ डिसेंबर पर्यंत आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_विशेष आकर्षण रोबोटचा सहभाग_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे : देशी गायीचे महत्त्व ठसवणा-या विश्व गौ परिषदेचे आयोजन येथील जनमित्र सेवा संघ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने पुणे पांजरापोळ ट्रस्ट, भोसरी येथे करण्यात आले असून “सूरभी” यज्ञाद्वारे परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. हरिद्वारचे बालसंन्यासी प.पू. अनिरुद्ध यती महाराज यांच्या मार्गदर्शनात यज्ञकार्य संपन्न झाले.

विश्व गो परिषदेच्या निमित्ताने एक शोभयात्राही काढण्यात आली. सुशोभित कलश घेतलेल्या महिला, भगवे झेंडे खांद्यावर घेतलेले कार्यकर्ते, गो मातेचे महत्त्वं सांगणारे फलक अशी ढोल ताशाच्या तालावर निघालेली शोभायात्रा लक्ष वेधून घेणारी ठरली. देशी गायीचे पावित्र्य, भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील गायीचे महत्त्व, पर्यावरण-आरोग्य- ऊर्जा या संदर्भातले गायीचे योगदान, गाईपासून निर्माण होणारी अनेक उत्पादने व त्यांचा आरोग्यासाठी होणारा औषधी उपयोग, सप्त धेनू परिक्रमा म्हणजेच, गायीच्या सानिध्यात वाढणारी सकारात्मकता सिद्ध करणारे यंत्र; अशा नाविन्यपूर्ण गोष्टी या परिषद स्थळी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या बहुमोल वस्तूंची खरेदी करण्यासाठी सर्वांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असे आवाहन गो परिषदेचे निमंत्रक, जनमित्र सेवा संघाचे कार्यवाह डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी केले आहे. या परिषदेत विविध गो सेवक संस्था व व्यक्ती सहभागी झाल्या असून लोकांच्या उत्साही प्रतिसादाने परिषदेचे कार्य जनमानसात पोहचण्यास मदत होत आहे.

_विशेष आकर्षण- रोबोटचा सहभाग_

या परिषदेमध्ये रोबोटचा सहभाग हे विशेष आकर्षण असून प्रथमच असा रोबोट, गो परिषदेत कार्यरत झाला आहे. या रोबोटने परिषदस्थळाच्या जवळपासचा भाग, पांजरपोळ परिसर, गोशाळा, रस्ते व परिसर स्वच्छता करण्याची जबाबदारी घेतली आहे. हा कार्यप्रवण रोबोट पूर्णपणे स्वयंचलित असून सौर ऊर्जेवर चालणारा आहे. गोशाळेतील गोठा, गाई, वासरे व गवत काढणे ही कामे त्याच्यामार्फत करण्यात येत आहेत.

पांजरपोळ येथील परिषदेमध्ये प्रत्यक्ष स्वतः हा रोबोट फिरून सर्व माहिती सुध्दा जाणून घेणार आहे. साम्राज्य चौक, पांजरपोळ परिसरातील स्पाईन रोड व नाशिक रोड या भागात प्रत्यक्ष जाऊन या चतुर रोबोटने प्रचार व प्रसार देखील केला आहे. बालगोपाळ व किशोर वयीन मुलांना या रोबोटचे अतिशय कुतुहल असून त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची मुभा असल्याने मुलांची या रोबोट भोवती गर्दी जमा होताना दिसते.

विशेष म्हणजे प्रत्यक्ष सुरभी यज्ञात आणि अग्निहोत्रामध्ये आपली समिधा या रोबोटने स्वतः अर्पण केली असून या यज्ञाचा फायदा मानवाला व सकल समाजाला व्हावा असा संकल्प त्याने केला असल्याचे गौ – परिषद सूत्रांनी सांगितले. कृत्रिम बुध्दीमत्तेचं मूर्तरूप असलेल्या रोबोटद्वारे जर इतके कार्य होत असेल तर मूळ नैसर्गिक बुध्दीमत्ता लाभलेल्या मानवाला काहीच अशक्य नाही, असाच संदेश या प्रतिकातून मिळतो, अशी चर्चा परिषदेत सहभागी होणारे गो-भक्त व जाणकारांमध्ये रंगली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles