जि.प.कन्नड येथील शाळेत आनंदनगरी उत्साहात संपन्न

जि.प.कन्नड येथील शाळेत आनंदनगरी उत्साहात संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कन्नड: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड नं.१ येथे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा बाल’ आनंद मेळावा ‘म्हणजेच आनंद नगरीचे आयोजन दि.२१ रोजी करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी श्री.शेषराव गंडे,यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्र.केंद्रप्रमुख दिलीप गायकवाड यांनी फित कापून केले. तर प्रमुख अतिथी म्हणून कन्नड नं.2 उर्दूचे अकबर सर,फजल सर,साजेदा बाजी,खान बाजी,सह प्रशालाचे सुहास पवार,खैरणार सर उपस्थित होते.

आनंद नगरीत सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून विक्रीसाठी मांडले होते. त्यामध्ये स्कूल पुरी भाजी, वडापाव, समोसा, पेढा पाणीपुरी, भेळ, चिप्स, भजी,पापड, कांदा, पावभाजी, कढी भजे, साबूदाना वड़ा, चहा, पापडी चाट,तिळाचे लाडू, पॉपकॉर्न,मटकी, हरभरा,मिसळ पाव, यासारखे अनेक पदार्थ विक्रीसाठी होते, अतिशय नियोजनबध आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, शालेय समिती सदस्य, विनोद वाघ,मोनिका शेजवळ, रोशनी शेख,गणेश साळवे, प्रशाला व नं. 2 उर्दू शाळा मधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यामध्ये विद्यार्थ्यांनी खरेदी-विक्री कशा पद्धतीने होते हे प्रात्यक्षिक त्यांना समजून आले या कार्यक्रमांमध्ये गावातील भरपूर पालकांनी सहभाग नोंदवला त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे बनवलेले पदार्थ गावकऱ्यांनी विकत घेतले. कार्यकम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक कल्पना सुर्यवंशी मँडम, सबा अन्सारी मँडम, अर्चना पाटील मँडम,सुवर्णा गायके मँडम,कल्याण राऊत मामा,इस्माईल शेख, (स्वंयपाकी)सह तिन्ही शाळेचे सर्व शिक्षक मंडळीचे परिश्रम लाभले. विशेष सहकार्य प्रशालाचे कला शिक्षक खैरणार सर यांचे लाभले.शाळेच्या सर्व विद्यार्थ्यिंनी खाऊ गल्लीचा आनंद लुटला.
कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेचे शिक्षक सतीश कोळी यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles