‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा; चंदू डोंगरवार

‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा; चंदू डोंगरवार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️ आदरणीय राहुल पाटील सरांनी आज संकलन केलेले सर्वच आदर्श वाचकांनी मनोभावे दिलेल्या सविताताईच्या लेखणीलाच नव्हे तर समग्र वाचकांच्या प्रतिक्रियांचे संकलन वाचकांसाठी दिलेली अनोखी भेटच म्हणावे लागेल. सर्वांच्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया विषयानूरुप एकत्र वाचायला मिळाल्या हे वाचकांसह माझे भाग्य आहे… अर्थात हा नवा उपक्रम बघायला मिळाला याचा सर्वांना अभिमान वाटतो.. आनंद होतोय..!

समुहातील दिलेला विषय हायकू असो, चित्र चारोळी किंवा चारोळी सोबतच काव्यरचना…! यातील शिलेदारांनी नेहमीच आपले लेखन कौशल्य पणाला लावून त्यांनी लेखणीला वेगवेगळ्या कल्पनेतून आकार दिला आहे व समुहात सादरीकरण केले आहेत. आणि त्यावर निरीक्षण वजा परिक्षण करुन परिक्षक मंडळी यांनी आपले अभिप्राय कळविल्यानंतर रचनाकारास व त्याच्या उत्तम लिखाणास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत गेलंय. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना येवून विभिन्न उत्तम अशी साहित्य निर्मिती करण्यासाठी मा. राहुल पाटील सरांकडून हातभार लावला जातो..!

ब-याच वेळा असे दिसून येते की, लिहिणारे लिहीतात आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता तात्पुरते विसरून जातात…! आश्चर्य मात्र जेव्हा निकाल येतो तेव्हा सर्वोत्कृष्ट रचना व लेखणीचा सन्मान करण्यात येण्यासाठी त्या शिलेदारास “तुमचा फोटो पाठवा” असा संदेश मा. राहूल पाटील सरांचा जातो. तेव्हा नवोदितांना कुतूहल वाटते.. आणि जेष्ठ शिलेदारांना आनंदाचा सुखद धक्काच बसतोय..! रचना तीन ओळीतील हायकू असो कि, मग ती चारोळी, चित्र चारोळी या कोणतीही काव्यरचना असो आनंद इतका होतो की गगनात मावेनासा वाटतो.. कारण म्हणजे ते निवडलेले लिखाण कल्पनेतून असे कि वास्तव … कुठे तरी परिक्षकांच्या मनाला छेदून जाते. म्हणून त्यावरसर्वानुमते सर्वोत्कृष्ट रचनेची मोहर लावली जाते. साकारलेली रचना, हायकू किंवा चारोळी वाचनीय व महत्त्वाचे असते आणि इतरांना प्रेरणादायी ठरतेय. कवीमनाला चालना देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन झटत असलेले पाटील सरांचे नेहमी आम्ही दोन शब्दात कौतुक करुन आभार मानन्यातच धन्यता समजतो..!

आज माझ्या मनात विचार आला की, सर्वांचे कौतुक करण्यात व त्यांच्या लेखणीला धार देणा-या व्यक्तीमत्वाबद्दल काही वेगळे लिहून त्यांचे अभिनंदन करावे… अर्थात मला कदाचित हे अधिकार नसेल पण या समुहात काम करतांना एवढातरी हक्क मिळाला असेल अशी भावना बाळगून त्यांचा धाकटा बंधू या नात्याने हे लिहीण्याचे धाडस केले.

मा. राहुल पाटील सर “मुख्य समुह प्रशासक आणि संपादक” मराठीचे शिलेदार समुह संस्था नागपुर यांचे कार्यास आणि पुढील वाटचालीस चंदू डोंगरवार कडून हार्दिक शुभेच्छा..! याद्वारे सरांचे अभिनंदन…! 🌹

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles