मोडगाव येथे केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न

मोडगाव येथे केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हणमंत हेड्डे, प्रतिनिधी

पालघर,डहाणू: दिनांक ०६ जानेवारी २०२२ रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळा मोडगाव येथे जिल्हा परिषद पालघर अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाला.कोरोना मुळे दोन वर्षा नंतर प्रथमच वार्षिक केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेंडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.महेश शेतसंधी यांनी भूषविले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री.लहानू चौधरी, शाळा व्य.समिती अध्यक्ष श्री.सुभाष रांधे ,शांती आदिवासी मोडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुरेश हरपले हे लाभले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत यजमान शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक श्री.जयवंत वरठा तसेच शाळेतील शिक्षक गणेश कनोजा,विशाल चोपडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.स्वागत सोहळा शाळेच्या मुख्य मैदानात पार पडला. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे,तसेच खेळ खेळताना खेळाडू वृत्ती कसे दाखवावे याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच स्पर्धेचे क्रीडा रेफरी श्री.गोपाळ ओझरे यांनी खेळाडूंना खेळाचे नियम समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजू चौधरी जीवल्या चौधरी यांनी केले तर क्रीडा शपथ श्री.तानाजी महानवर यांनी सर्व खेळाडूंना दिली. क्रीडा स्पर्धेचे आयोजन शाळेच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांनी लाल फित कापून व नारळ फोडून केले.

क्रीडा स्पर्धेत विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लंगडी, कबड्डी, खो-खो , रिले रेस, संगीत खुर्ची, धावणे,लांब उडी खेळांचा समावेश होता.स्पर्धेचे आयोजन दोन गटात विभागले होते.एक लहान गट इयत्ता १ ली ते ५ वी व दुसरा मोठा गट इयत्ता ६ वी ते ८ वी.जवळपास १७ शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.

खोखो खेळामध्ये मोडगाव संघाने तर कबड्डी मध्ये शिलोंडा संघाने विजेतेपद पटकावले. तसेच लहान गट लंगडी खेळात मुलींमध्ये आम्रुणपाडा तर मुलांमध्ये शिलोंडा चिंचपाडा शाळेने विजेतेपद पटकावले.वैयक्तिक धावणे ५० मी स्पर्धेत लहान गट मुलांमध्ये आशिक ठाकरे-आम्रुणपाडा, तर मुलींमध्ये दिपाली सवरा मोडगाव तसेच मोठा गट धावणे १०० मी स्पर्धेत अक्षय बरफ शिलोंडा तर मुलींमध्ये अर्चना रावते मोडगाव या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला.संगीत खुर्ची स्पर्धेत मुलीत भक्ती महाला बातरापाडा तर मुलांमध्ये संदेश गिंभल हा विद्यार्थी प्रथम आला.

सदर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री.रमेश वाघदडा,कृष्णा भोये,नितीन पडवळे,दयानंद विघ्ने,अरुण चव्हाण,तानाजी महानवर,नितीन समुद्रे,स्वप्नील आंबेकर,दीपक रिकामे,संजय रूपनवर,नरेश भोये,शिवाजी वळवी तसेच क्रीडा सरपंच म्हणून श्री.गोपाळ ओझरे,लक्ष्मण महाला,रामचंद्र वाघात यांची नियुक्ती करण्यात आली होती.

संपूर्ण खेळ यशस्वीरित्या खेळून झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शाळेच्या मुख्य मैदानात पार पडला. या मध्ये सर्व विजयी संघाना व वैयक्तिक स्पर्धेत विजयी खेळाडूंना चषक,मेडल व प्रशस्ती प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात बेंडगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.महेश शेतसंधी यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यात महत्वाचे योगदान देणारे सर्व शिक्षक, तसेच उपस्थित सर्व शाळांचे शिक्षक वृंद,विद्यार्थी, प्रमुख पाहुणे व सर्वांचे आभार मानले आणि वंदेमातरम् गायनाने संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोरोना काळात संपूर्ण जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दरवर्षी होणारे केंद्रस्तरीय स्पर्धा दोन वर्षे आयोजित करता आले नव्हते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना बाहेर काढण्यास मार्ग मिळत नव्हता. मात्र या क्रीडा स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे अंगातील गुण प्रकट करण्याची संधी प्राप्त झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles