तुझ्याचसाठी..; उर्मी घरत
मोहरते मन माझे
स्वप्न पाहता तुझे
सुर छेडताना वीणेचे
गीतही ओठी तुझे
रेखताना रांगोळी अंगणी
रंगही त्यात असती तुझे
भरताना ओंजळ सुखाची
कतृत्व त्यातही झळके तुझे
माझ्या हदयाच्या अंतरंगी
चलचिञही फिरे तुझे
माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण
गुणगुणे केवळ गीत तुझे.
गुणगुणे केवळ गीत तुझे.
सौ.उर्मी (हेमश्री)घरत,पालघर