Home नागपूर चंद्रपूर  सावित्रीमाई

सावित्रीमाई

17

सावित्रीमाईपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

माई तुझ्या त्यागामुळे
जीवनाला अर्थ आला
स्पर्धेच्या या युगामध्ये
आमचा जन्म सार्थ झाला

शेण चिखल माती
सारी अंगावर घेतली
तरी शिक्षण कार्याला
माघार नाही घेतली.

दुष्ट समाजकंटक करी
स्त्री जातीवर व्यभिचार
अज्ञान आमचा शेतकरी
मात्र भीतीने राही लाचार

धुणी भांडी उष्टी काढा
कपाळावर आमच्या गोंदन
उद्धार करण्या स्त्री जातीचा
आम्हा शिक्षण दिले आंदण

विधवांना आधार देऊन
अनाथाची माता झाली
बालहत्या प्रतिबंधकाने
आमची क्रांतीज्योती झाली

माई तुझे उपकार आम्ही
कधी विसरणार नाही
करतो वंदन मनापासून
सावित्रीबाई तुझ्या ठाई

प्रा. दिनकर झाडे, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय , गडचांदूर जिल्हा चंद्रपूर.