
शिक्षणव्रती
ज्ञानज्योती सावित्री माई
स्त्रियांसाठी राबत होती
स्त्री सेवा आणि करुणेचा
एक वेगळाच आदर्श होती
सामाजिक न्याय विषयी
चिंतन करुन घडवली क्रांती
स्त्री पुरुष शिक्षण समानता
लग्नानंतर उदयास आली
घराच्या बाहेर उंबरठ्यावर
शिक्षणासाठी टाकले पाऊल
स्वतः शिक्षण घेतले तेंव्हा
स्त्री शिक्षणाची लागली चाहूल
ह्रदयात बसली आहेस..!
दलित पिडीत शोषितांच्या
संघर्षाची मुर्तीमंत आपल्या
यशस्वी झालेल्या त्या लेकींच्या
शिक्षणव्रती सावित्रीबाई तु
होती ज्ञानाचा करुणा सागर
‘तुझी जयंती’ निमित्त साधून
लिहीता आले मज चार अक्षर
चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
=====