मराठा विद्या प्रसारक समाजतर्फे राजमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव उत्साहात साजरा

मराठा विद्या प्रसारक समाजतर्फे राजमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज नागपूर तर्फे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव गुरुवार १२ जानेवारी २०२३ ला संस्थेच्या सक्करदरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर शहराच्या कर्त्यव्य दक्ष सह पोलीस आयुक्त आयुक्त सौ.अश्वतीताई दोरजे IPS, श्रीमंत सौ.यशोधरा राजे भोंसले तसेच प्रमुख वक्त्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका व राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मा.डॉ.सौ. लिनाताई निकम यांचेसह विजयकांत सागर (पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र.४) पुंडलिक भटकर(सहा. पोलीस आयुक्त सक्करदरा विभाग) सौ. कल्याणी हुमने (प्र.पोलीस निरीक्षक सक्करदरा पोलीस स्टेशन) प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुरुवातीला शिवकालीन वेशभूषेचे आयोजन करण्यात आलेले होते. विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँ साहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य सचिव डॉ.प्रकाश मोहिते यांनी केले तर संचालन तथा कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कार्यकारिणी सदस्या सौ.अनिताताई जाधव व सौ. ममताताई भोसले यांनी केले.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री शिरीष राजेशिर्के, अनुप जाधव, हेमंत शिर्के, महेंद्र शिंदे, निलेश चव्हाण, अविनाश घोगले, कृष्णाजी गायकवाड, गजानन कावळे, महेश पवार यांचे सह समाज बंधूभगिनींची भरगच्च उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles